श्रीपाद सिमंतकर, उदगीर एकीकडे दुष्काळाने पिके होरपळली असतानाच योग्य कृषी व्यवस्थापनाद्वारे उदगीर तालुक्यातील मोघा येथील शेतकरी शिवसांब माधवराव पाटील यांनी तूर उत्तमरित्या पिकविली आहे़ एक ते सव्वा एकरात २ किलो बी टोबण ३ बाय ३ पध्दतीने पेरणी करुन ही किमया साध्य झाली आहे़ अत्यल्प पावसावर वाढलेल्या आठ फुट उंच तुरीला उत्तम फूल व फळधारणा झाली आहे़ विशेष म्हणजे, या पिकासाठी रासायनिक खताचा कणमात्रही वापर करण्यात आलेला नाही़ खरीपाच्या हंगामात टोबण पध्दतीने एक ते सव्वा एकर कोरडवाहू शेतात पाटील यांनी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने तूर पेरली़ या तूरीला केवळ पावसाचे पाणी मिळाले़ इतर कुठल्याही पाण्याचे नियोजन करण्यात आले नव्हते़ जमीनीतील पाण्याचे बाष्पीभवन होेवू नये यासाठी पांढऱ्या पोटॅश चा वापर करण्यात आला़ पाटील यांनी कटाक्षाने रासायनिक खताचा वापर करण्याचेही टाळले़ वर्तमानस्थितीतील उत्तम पीक म्हणून पाटील यांची तूर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी येत आहेत़ आत्मा या कृषी क्षेत्रातील विभागाचे सुरेश बावीस्कर व त्यांच्या पथकानेही या तूरीची पाहणी करुन उल्लेखनीय पिक असून उत्तम उत्पादन हाती येईल असे मत प्रकट केले़
अत्यल्प पाण्यावर बहरली तूऱ़़
By admin | Updated: November 8, 2015 23:43 IST