शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

डाळींब, उसाला भीषण आग

By admin | Updated: May 28, 2014 00:21 IST

केज/कडा : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी डाळींब बाग तसेच उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

केज/कडा : जिल्ह्यात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी डाळींब बाग तसेच उसाच्या फडाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगी मागचे कारण गुलदस्त्यात असून या हानीने शेतकर्‍यांचे संसार उघड्यावर आले आहेत. केज तालुक्यातील साळेगाव येथे खोराडीचे शेत या शिवारातील सर्व्हे नं. ५०८,५०९ मध्ये खय्यूम पठाण, नय्यूम पठाण, शब्बीर मियाँ सय्यद, अजीम पठाण या चार शेतकर्‍यांचा ऊस आहे. एकूण पाच एकर क्षेत्रावर असलेल्या या उसाच्या फडात ठिबक सिंचनही अंथरलेला होता. मंगळवारी दुपारी २ वाजता फडाने पेट घेतला. त्यानंतर आगीच्या ज्वाला बाहेर पडण्यास सुरूवात झाली. संपूर्ण फड आगीने कवेत घेतला. त्यामुळे उभा ऊस खाक झाला. मंडळ अधिकारी भागवत पवार, तलाठी सुभाष डोरले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेमुळे या चारही शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक आगीने हिरावून घेतल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पंचनामा केला असून आगीचे कारण स्पष्ट होत नाही. याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर नुकसान भरपाईच्या बाबतीत तेच ठरवतील असे, मंडळ अधिकारी भागवत पवार यांनी सांगितले. (वार्ताहर) दोन एकर डाळींब बाग खाक आष्टी तालुक्यातील तागडखेल येथील शेतकरी बलभीम रंभाजी गव्हाणे यांनी आपल्या शेतात दोन एकरवर डाळींब लागवड केली होती. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास डाळींबाच्या बागेतून धूर निघण्यास सुरूवात झाली. त्यानंतर परिसरातील शेतकर्‍यांनी त्यांना याची माहिती दिली. गव्हाणे यांनी तातडीने शेतात धाव घेतली तेव्हा संपूर्ण बाग जळत होती. त्यामुळे आग विझविण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. त्यांच्या बागेजवळून विद्युत वाहिनी गेलेली आहे. त्यामुळे स्पार्र्कींग होऊन आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. डाळिंबाच्या झाडाला फळे लगडली होती. अवघ्या वीस दिवसावर तोडणी आली होती. अशा स्थितीत आगीने होत्याचे नव्हते केले. कर्ज काढून त्यांनी बाग जोपासली होती.