शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
Top Marathi News Live: सोन्याची 'चांदी', प्रती तोळा ११ हजार रुपयांनी महागले
3
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
4
Gold-Silver Price Today: चांदी ₹३ लाखांच्या पार, सोनं ₹१० हजारांनी महागलं, इम्पोर्ट ड्युटी वाढल्यानंतर काय आहे २४K, २२K, १८K चा भाव?
5
प्रतीक यादव यांच्या मृत्यूनंतर पोलीस अपर्णा यादव यांच्या घरी जाणार; गूढ वाढलं, नेमकं काय घडलं?
6
Prateek Yadav: फिटनेसचे वेड, लक्झरी गाड्यांचा शौक, प्राण्यांबद्दल आपुलकी; प्रतीक यादवबद्दल काही खास गोष्टी!
7
हाण की बडीव! "तुझ्या भागातील डास मला चावताहेत..."; मच्छरदानीवरुन रूममेट्स भिडले
8
Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना..! गोजुबावी गावाजवळ अपघात, पायलट ट्रेनिंग सुरू असताना शेतात कोसळलं (Video)
9
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा झटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
10
Aparna Yadav : किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
11
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
12
अलविदा इंडिया! १६ वर्ष भारतात राहिल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडला देश, म्हणाली...
13
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
14
Stock Market Today: सोन्यावरील आयात शुल्कात वाढ आणि कच्च्या तेलाचा भडका; शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात
15
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
16
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
17
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
18
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
19
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
20
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस दल देणार एक दिवसाचे वेतन

By admin | Updated: May 13, 2014 01:02 IST

परभणी : नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या लक्ष्मण मुंडे यांच्या कुटुंबीयांना परभणी पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन देण्यात येणार आहे.

परभणी : नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या लक्ष्मण मुंडे यांच्या कुटुंबीयांना परभणी पोलिस दलातील पोलिस कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली येथील लक्ष्मण कुंडलिक मुंडे हे गडचिरोली येथे पोलिस हेडकॉन्स्टेबल म्हणून बारा वर्षांपासून सेवेत होते. अंतरवेलीसारख्या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले लक्ष्मण मुंडे आपल्या कर्तव्याप्रती नेहमीच प्रामाणिक असत. गडचिरोलीसारख्या नक्षली भागात स्कोड सी ६० या अति महत्त्वाच्या विभागात कर्तव्य बजावत होते. १० मे रोजी आपल्या सहा सहकारी जवानांसमवेत या भागात गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात लक्ष्मण मुंडे हे शहीद झाले. शहीद लक्ष्मण मुंडे यांच्या पार्थिवदेहावर १२ मे रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर केंगार, पोलिस निरीक्षक राठोड, गंगाखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम चव्हाण, पिंपळदरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम ढाबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गादेवाड, राखीव पोलिस निरीक्षक पंडित राठोड यांनी पार्थिवदेहावर पुष्प अर्पण केले. तोफांची सलामी दिल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी) शहीद जवान लक्ष्मण मुंडे यांच्या पार्थिवदेहावर सोमवारी गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसदलाच्या वतीने बंदुकीच्या २७ फैरी झाडून सलामी देण्यात आली. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने शहीद लक्ष्मण मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, शहीद लक्ष्मण मुंडे यांची कामगिरी अभिमानास्पद आहे. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या शहीद मुंडे यांनी आमच्यासमोर आदर्श ठेवला आहे. शहीद लक्ष्मण मुंडे यांच्या कुटुंबीयांना परभणी पोलिस दलातील कर्मचार्‍यांचे एक दिवसाचे वेतन दिले जाईल. त्याचप्रमाणे शासनातर्फे ७५ लाख रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येईल. परभणी येथील पोलिस मुख्यालयात नव्याने बांधण्यात येणार्‍या सभागृहाला शहीद लक्ष्मण मुंडे यांचे नाव दिले जाईल. लक्ष्मण मुंडे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस पोलिस सेवेत सामावून घेण्यात येईल. तसेच शहीद लक्ष्मण मुंडे हे जिवंत असताना त्यांना जे वेतन, पदोन्नती, भत्ते देय केले जाणार होते, ते त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना दरमहा दिले जाणार आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.