पोलिस भरती ; उद्या लेखी परीक्षा

By Admin | Updated: June 17, 2014 01:13 IST2014-06-17T00:41:29+5:302014-06-17T01:13:50+5:30

उस्मानाबाद : पोलिस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची बुधवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़

Police recruitment; Written exam tomorrow | पोलिस भरती ; उद्या लेखी परीक्षा

पोलिस भरती ; उद्या लेखी परीक्षा

उस्मानाबाद : पोलिस शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीस पात्र ठरलेल्या २३२३ उमेदवारांपैकी शासकीय नियमानुसार पात्र ठरलेल्या १२४५ उमेदवारांची बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़
जिल्हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील १४० पोलिस शिपाई पदासाठी ६ ते ११ जून या कालावधीत पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर भरती प्रक्रियेच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या़ शारीरिक, मैदानी चाचणीत एकूण २३२३ उमेदवार पात्र ठरले होते़ यात ज्या उमेदवारांना ५० पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असून, त्यातील शासकीय नियमाप्रमाणे १:१५ या प्रमाणात १२४५ युवक-युवती उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत़ या उमेदवारांची चेस्ट क्रमांक व प्रवर्ग निहाय निकाल पोलिस मुख्यालयातील नोटीस बोर्डावर लावण्यात आला असून, जिल्हा पोलिस दलाच्या वेबसाईटवरही प्रसिध्द करण्यात आला आहे़
तसेच लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या नमुना व सूचनांचा फलक उमेदवारांच्या माहितीसाठी लावण्यात येणार आहे़
लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची बुधवारी सकाळी ७ वाजता पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर परीक्षा घेण्यात येणार आहे़ उमेदवारांना बँक कॉलनीकडील मार्गावरून कागदपत्र पडताळणीनंतर परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे़ तरी उमेदवारांनी ओळखपत्र, परीक्षा पॅड घेऊन वेळेवर हजर रहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)
तर होणार कारवाई
परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांकडे परीक्षेदरम्यान कॅल्क्युलेटर, मोबाईल, पुस्तक, चिठ्ठी आदी साहित्य आढळून आल्यास त्यांना परीक्षेतून अपात्र ठरिवण्याची कारवाई करण्यात येणार आहे़ त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी वरील साहित्य जवळ बाळगून कॉपी करताना आढळून आल्यास त्यांना परीक्षेतून अपात्र ठरविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: Police recruitment; Written exam tomorrow