शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून पोलिस भरती

By admin | Updated: June 6, 2014 01:08 IST

नांदेड : जिल्ह्यात पोलिस दलामध्ये रिक्त असलेल्या ७२ जागांसाठी उद्या ६ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होत आहे़ या जागांसाठी १९८५ अर्ज आले आहेत़़

नांदेड : जिल्ह्यात पोलिस दलामध्ये रिक्त असलेल्या ७२ जागांसाठी उद्या ६ जूनपासून भरतीप्रक्रिया सुरू होत आहे़ या जागांसाठी १९८५ अर्ज आले आहेत़़ या भरतीप्रक्रियेसाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी दिली़जिल्ह्यात पोलिस दलात रिक्त असलेल्या ७२ जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी ६४ जागा आहेत़ त्यात सर्वसाधारण १९, महिला १९, खेळाडू ३, प्रकल्पग्रस्त ३, भूकंपग्रस्त १, माजी सैनिक १०, अंशकालिन ६ आणि गृहरक्षक दलासाठी ३ जागा आहेत़ विमाव प्रवर्गासाठी असलेल्या ६ जागांमध्ये सर्वसाधारण २, महिला २ माजी सैनिक १ आणि अंशकालिनसाठी १ जागा आहे़ तर इमाव प्रवर्गासाठी २ जागा आहे़ त्यात सर्वसाधारण १ आणि महिलेसाठी १ जागा आहे़ या भरतीप्रक्रियेंतर्गत ६, ७ आणि ८ जून रोजी उमेदवारांचे शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व चेस्टर नंबर वाटपची कार्यवाही करण्यात येणार आहे़ तर १०, ११ व १२ जून रोजी मैदानी चाचणी होणार आहे़ १५ जून रोजी लेखी चाचणी होणार आहे़ या प्रक्रियेसाठी निवडक पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी तसेच कार्यालयातील कर्मचार्‍यांची निवड करण्यात अली आहे़ पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी सर्व प्रक्रियेची व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे़ पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शी व नि:पक्षपाती होणार असून कुणीही आमिष दाखवून पैशांची मागणी करीत असेल तर नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या ०२४६२-२५३५१२ या दुरध्वनी क्रमांकावर तसेच नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षकांच्या ०२४६२-२३४५०४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)भरतीसंदर्भात कार्यशाळापोलिस भरती प्रक्रियेसंदर्भात बुधवारी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात अधिकार्‍यांची कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेत पोलिस अधीक्षक परमजीतसिंघ दहिया यांनी मार्गदर्शन केले़ पोलिस भरती प्रक्रियेसंदर्भातील नियमावलींची विस्तृत माहिती भरतीप्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना यावेळी देण्यात आली़ या कार्यशाळेस अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले, श्याम घुगे, सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अमोघ गावकर आदींची उपस्थिती होती़