शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’

By admin | Updated: September 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’चा फार्म्युला अवलंबिण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

औरंगाबाद : वसतिगृहांमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या घुसखोरांविरुद्ध पोलीस ‘अ‍ॅक्शन’चा फार्म्युला अवलंबिण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. शैक्षणिक कालावधी संपला तरी अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही वसतिगृहांवर कब्जा केलेला आहे. त्यामुळे नियमानुसार प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थी वसतिगृहापासून वंचित आहेत. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज शुक्रवारी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पुढाकार घेऊन सर्व विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिका, वॉर्डन, विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलावली होती; पण या बैठकीस काही विभागप्रमुख व प्राचार्य उपस्थित राहिले नाहीत. या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की, वसतिगृहात बेकायदेशीरपणे ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यासाठी अगोदर ८ दिवसांच्या मुदतीची नोटीस दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी वसतिगृह सोडले नाही, तर मग कुलसचिव, विभागप्रमुख, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालिकांसमक्ष पोलिसांच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्याला वसतिगृहाबाहेर काढले जाईल. यासंदर्भात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले की, विभागप्रमुख व विद्यार्थी यांच्यामध्ये पाहिजे तसा सुसंवाद नाही. विभागप्रमुखांनीच विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. बेकायदेशीरपणे वसतिगृहे बळकाविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कृतीस संबंधित विभागप्रमुख हेच जबाबदार आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल संबंधित विभागप्रमुख व त्यांच्या प्राध्यापकांना माहिती असला पाहिजे. तो काय करतो, कुठे राहतो, त्याच्या संशोधनाचा कालावधी किती आहे. तो संपला असेल, तर त्याला कोणता सल्ला दिला, यासंबंधीची इत्थंभूत माहिती प्राध्यापकांना असावी; पण दुर्दैवाने ते होत नाही. यापुढे विभागप्रमुख व प्राध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.