शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू वाढीव गुणाचे भिजत घोंगडे

By admin | Updated: April 26, 2016 23:46 IST

बळीराम लाड, नांदेड दहावी व बारावी परीक्षेत वर्ष २०१५-१६ मध्ये बसलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या खेळाडूंना शासनाच्या वतीने वाढीव ग्रेस गुण देण्यात येतात.

बळीराम लाड, नांदेडदहावी व बारावी परीक्षेत वर्ष २०१५-१६ मध्ये बसलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या खेळाडूंना शासनाच्या वतीने वाढीव ग्रेस गुण देण्यात येतात. यावर्षी दहावी व बारावीचा निकाल एक महिन्यावर आला असतानाही क्रीडा विभागाकडून मान्यताप्राप्त संघटनेच्या याद्याला मान्यता मिळाली नाही. वाढीव ग्रेस गुण यावर्षी मिळणार की नाही, अशी भीती खेळाडू व पालकांत व्यक्त होत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत मान्यताप्राप्त क्रीडा संघटनेकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. त्या स्पर्धेमध्ये दहावी-बारावी या वर्गात शिकत असलेले खेळाडू सहभागी झाले होते. त्यांना वाढीव गुण प्रस्ताव संबंधित जिल्ह्याच्या क्रीडा कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यासाठी राज्य क्रीडा विभागाकडून संघटनेच्या याद्या जाहीर न झाल्यामुळे अडचणी येत आहेत. स्पर्धा घेऊन राज्य संघटना तथा असोसिएशनचे पदाधिकारी नामानिराळे झाले असून खेळाडू व पालक अडचणीत आले आहेत. शालेय गटातील वाढीव गुण प्रस्ताव एक महिन्यापूर्वीच क्रीडा विभागाच्या वतीने दाखल करुन घेण्यात आला. परंतु राज्य संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धातील खेळाडूंचे प्रस्ताव जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयात दाखल करुन घेत नाहीत. याबाबत क्रीडाधिकारी कार्यालय, राज्य संघटना पदाधिकारी, माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ तसेच शासनाच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ समन्वय साधून वाढीव गुण प्रस्ताव स्वीकारुन खेळाडूंना वाढीव गुण मिळावेत, अशी मागणी पालकांतून होत आहे. वाढीव गुणाचा प्रश्न निकाली निघाल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल़ (प्रतिनिधी)