शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणातील पिस्तूल पडेगावात जप्त

By admin | Updated: May 26, 2015 00:51 IST

औरंगाबाद : महिला वकिलाला अडकवण्याच्या उद्देशाने अट्टल गुन्हेगारांकडून स्वत:वर गोळीबार करून घेणाऱ्या अ‍ॅड. नीलेश घाणेकर यांचा बनाव दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणला.

औरंगाबाद : महिला वकिलाला अडकवण्याच्या उद्देशाने अट्टल गुन्हेगारांकडून स्वत:वर गोळीबार करून घेणाऱ्या अ‍ॅड. नीलेश घाणेकर यांचा बनाव दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणला. घाणेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेले आॅटोमॅटिक पिस्तूल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडेगाव, कासंबरीनगर दर्गा परिसरातून सोमवारी जप्त केले.याविषयी पोलिसांनी सांगितले की, बलात्काराची तक्रार पोलिसांत नोंदविणाऱ्या महिला वकिलाला धडा शिकविण्यासाठी ५ मे रोजी मध्यरात्री बीड बायपास रोडवरील गोदावरी टी पॉॅइंटजवळ आरोपींकडून घाणेकर यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. पोलिसांनी घाणेकर यांच्यासह शेख मुजफ्फर ऊर्फ सोनू जहागीरदार, सय्यद मुजीब (३४, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) यांना अटक केली आहे. आरोपी राजू जहागीरदार आणि समीर पठाण हे अद्याप फरार आहे. मुजीब याने गोळीबार केला होता. घटनेनंतर तो पिस्तुलासह पळून दुचाकीवर पळून गेला होता. पोलीस चौकशीदरम्यान सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सोमवारी सकाळी पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी सुरू केली असता त्याने सहकार्य करीत कासंबरी दर्गा परिसरातील एका बाभळीच्या झाडाखाली खड्डा खोदून लाल रंगाच्या कपड्यात पिस्तूल पुरून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ती जागाही दाखविली. पोलिसांनी त्या ठिकाणी उकरून पाहिले असता लाल रंगाच्या कपड्यात त्यांना पिस्तूल मिळाल्याचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले. सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक सुभाष खंडागळे, अयुब पठाण, दत्ता गडेकर, शेख जावेद यांनी पंचांसमक्ष हे पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी आतापर्यंत आरोपींकडून एक टाटा सफारी कार, रिकाम्या दोन पुंगळ्या, एक मोटारसायकल जप्त केलेली आहे. दरम्यान अटकेतील मुजफ्फर आणि मुजीब यांची पोलीस कोठडी एक दिवस वाढली आहे. घाणेकर यांच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.