शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपांवर ठणठणाट

By admin | Updated: September 3, 2015 00:28 IST

जालना : जालना शहरातील बहुतांश पेट्रोलपंप बुधवारी बंद होते. नो स्टॉक फलकांमुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याने पंप बंद ठेवण्यात आले

जालना : जालना शहरातील बहुतांश पेट्रोलपंप बुधवारी बंद होते. नो स्टॉक फलकांमुळे वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले. पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याने पंप बंद ठेवण्यात आले की काय अशी चर्चा वाहनचालकांत सुरु होती.जालना शहरात शासकीय व खाजगी असे एकूण १८ पंप आहेत. यापैकी बहुतांश पंपांवर दुपारनंतर ठणठणाट होता. शहरातील विविध भागात पेट्रोल पंप आहेत. या ठिकाणी नियमित पेट्रोल मिळते. मात्र भाव कमी झाल्याने चालकांनी पंप बंद ठेवल्याच्या आफवेने वाहनचालकांची चांगलीच धावपळ झाली. काहींना दूरपर्यंत वाहन घेऊन चालावे लागले. अर्ध्यापेक्षा अधिक पंप बंद असल्याचे अनेक वाहनचालकांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी पेट्रोलचे भाव दोन रुपयांनी तर डिझेल पन्नास पैशांनी कमी झाले. भाव कमी होताच अनेक वाहनचालकांनी पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पंप चालकांकडे जो जुना स्टॉक होता तो संपला. भाववाढीमुळे काही चालकांनी पेट्रोल व डिझेलची आॅर्डर दिली नव्हती. नवीन व जुन्या भावातील तफावतीमुळे नुकसान नको म्हणून अनेकांना विचारपूर्वक आॅर्डर दिल्याचे काही पंप चालकांनी सांगितले. असे असले तरी याचा फटका सर्वच वाहलनचालकांना सहन करावा लागला. बुधवारी मध्यरात्री अथवा गुरुवारी पहाटेपर्यंत सर्वच ठिकाणी पेट्रोल मिळेल असे पंप चालकांनी सांगितले. भारत, इंडेन, एचपीसीएल, हिंदुस्थान पेट्रोलियमचे काही पंप बंद तर काही सुरु होते. खाजगी पंप सुरु असल्याचे त्या पंपचालकांनी सांगितले. खाजगी पंपावर मुबलक पेट्रोल होते असा दावा केला. नवीन भावानुसारच पेट्रोलची विक्री होत असल्याचे सांगण्यात आले. एकूणच भाव वाढीच्या घोळात अन काही पंप चालकांनी पंप बंद ठेवल्याची प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त केली. भाव वाढ आणि पंप बंद याचा कोणताही संबंध नसल्याचे एका पंप चालकाने सांगितले. बुधवारी दुपारनंतर पंप बंदची चर्चा समजताच सर्वच पंपावर वाहनचालकांची मोठी गर्दी दिसून आली. या गर्दीमुळेही होते ते पेट्रोलही संपले. त्यामुळे पंप चालकांना नो स्टॉकचे फलक लावावे लागले. नागरिकांचे हाल पाहता पंप चालकांनी सूचना पत्रक काढावे, अशी मागणी काही वाहनचालकांनी केली. तर भाव कमी झाल्याचेमुळे पंप चालकांनी पंप बंद ठेवल्याचे काही वाहनचालकांनी ठासून सांगितले. एकूणच शहरात दुपारनंतर पेट्रोलच्या चर्चेला एकच उधाण आले होते. गुरुवारी पहाटे पेट्रोल सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल ६७.३७ वरुन ६५.३८ रुपयांवर आले. म्हणजचे पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. डिझेलही ४९.७३ वरुन ४९.२१ रुपयांवर आले आहे. पेट्रोलचे दर कमी झाल्याने वाहनचालकांतून विशेषत: दुचाकी चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.४जालना शहरात मनमाड, वाशी आदी ठिकाणाहून पेट्रोल येते. बुधवारी कामगारांच्या देशव्यापी संपामुळे पेट्रोल वाहतुकीवर परिणाम झाला. नांदगाव येथेही काही कामगार संघटनांनी टँकरसमोर धरणे धरल्याने टँकर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे एका पंप चालकाने सांगितले.