शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 17, 2014 00:07 IST

परभणी : जिल्ह्यात पिकांवर तुडतुडे, फुलकिडे व उंट आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे आणखी एक संकट या शेतकऱ्यांवर कोसळले आहे़

परभणी : जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे़ काही भागात शेतकऱ्यांनी ठिबकवर कापूस, सोयाबीन जगविला असून, या पिकांवर तुडतुडे, फुलकिडे व उंट आळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे़ त्यामुळे आणखी एक संकट या शेतकऱ्यांवर कोसळले आहे़ यावर्षी शेतकऱ्यांवर संकटाचा मारा सुरू आहे़ जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या या दुष्टचक्राचा अजूनही शेवट झालेला नाही़ फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली़ यात संपूर्ण रबी हंगाम धुवून गेला़ रबी हंगामातील काहीही हाताशी न लागल्याने शेतकरी हताश झाला होता़ या संकटातून कसेबसे सावरत खरिपाच्या तयारीला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला़ परंतु, निसर्गाने पुन्हा एकदा दगा दिला़ पावसाने पाठ फिरविली असून, अर्धा पावसाळा संपल्यानंतरही वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही़ त्यामुळे दुबार तर काही भागात तिबार पेरणी करावी लागली़ पेरणीवर मोठा खर्च करूनही पिके मात्र जेमतेमच आहेत़ पाऊस नसल्याने अनेक भागात पेरलेले उगवलेच नाही़ अशाही परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनवर कापूस, सोयाबीन ही पिके जगविली़ परंतु, सध्याच्या स्थितीला कापसावर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा कहर, सोयाबीनवर हिरव्या उंट आळ्यांचा प्रादुर्भाव दिसत आहे़ त्यामुळे या प्रादुर्भावापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे़दरम्यान प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर कशा प्रकारे उपाय योजना करावी, या विषयीचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे़ (प्रतिनिधी)तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास...कापूस पिकावर तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांनी शिफारसीपेक्षा जास्त नत्राचा वापर करू नये, संकरीत वाणाकरीता इमीडॅक्लोप्रिड ७० डब्ल्यू़ एस़ किंवा थायमिथॉक्झॉम ७० डब्ल्यू़ एस़ ५ ते ७ ग्रॅम प्रतिकिलो ग्रॅम बियाणे या प्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास ३० ते ६० दिवसांपर्यंत तुडतुड्याच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्यास मदत होते़ आर्थिक नुकसानीची पातळी दोन-तीन तुडतुडे प्रति पान तसेच १० फुलकिडे प्रति पान आढळल्यास अ‍ॅसिफेट ७५ एस़पी़ २० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ एस़सी़ २० मिली किंवा अ‍ॅसिटामीप्रीड २० एस़ पी़ २ ग्रॅम किंवा थायमोथॅक्झॉम २५ डब्ल्यू़ जी़ ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी़ फवारणी शक्यतो साध्या व ट्रिपल अ‍ॅक्शन नोझलच्या पंपाने करावी़ थेंब तुषारासारखे पडावेत व पानाच्या मागच्या बाजूने व्यवस्थितरित्या फवारणी करावी, असे आवाहन डॉ़ भोसले यांनी केले आहे़