बीड : पेन्शनधारकांना किमान ६५०० रूपये पेन्शन व त्यावर महागाई भत्ता द्यावा, मोफत आरोग्य सेवा द्यावी, अन्न सुरक्षा कायद्यात पेन्शनधारकांना सामिल करावे यासारख्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा सर्व श्रमिक संघटेनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.आण्णाभाऊ साठे चौकातून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यामध्ये एम.आर.घुले, आर.व्ही.महामुनी, के.डी.उपाडे, एम.टी.मुंडे, जे.आर.शेख, व्ही.के.पवार, एच.आर.मस्के, हेमंत कुलकर्णी, ए.जी.चव्हाण यांच्यासह शेकडो पेन्शनधारकांची उपस्थिती होती.
बीडमध्ये पेन्शनधारकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 12:36 AM