शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएसओ’च्या परीक्षेत १२४ गणवाड्या उत्तीर्ण

By admin | Updated: October 29, 2014 00:44 IST

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मिळावे यासाठी सदरील विभागाकडून लोकसहभागाचा आधार घेतला.

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत असलेल्या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ मिळावे यासाठी सदरील विभागाकडून लोकसहभागाचा आधार घेतला. याला पहिल्याच प्रयत्नात चांगले यश मिळाले आहे. १४५ पैकी १२४ अंगणवाड्या ‘आयएसओ’ साठी पात्र ठरल्या आहेत. उर्वरित अंगणवाड्यांच्या बाबतीत काही त्रुटी निघाल्या असून, त्याची पूर्तता करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.खाजगी अंगणवाड्यांच्या तोडीस तोड जिल्हा परिषदेच्याही अंगणवाड्या असाव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून उपक्रम हाती घेण्यात आला. अंगणवाडी डिजीटल बनविण्यासाठी लोकसहभाग घेण्यात आला. पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास १४५ अंगणवाड्या निवडण्यात आल्या होत्या. या अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून रंगरंगोटी, टी.व्ही. संच, ड्रेस, डेस्क, पाण्याची सोय, खेळाचे साहित्य आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या. यासाठी त्या-त्या अंगणवाड्यांच्या कार्यकर्ती, सेविकांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच या अंगणवाड्या खाजगी अंगणवाडीच्या तोडीस तोड निर्माण झाल्या आहेत.दरम्यान, सदरील अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ दर्जा मिळावा, यासाठी औरंगाबाद येथील एका संस्थेकडे तपासणीचे काम सोपविले होते. या संस्थेने बालकल्याण विभागाने प्रस्तावित केलेल्या अंगणवाड्यांची तपासणी केली. या तपासणीमध्ये १२४ अंगणवाड्या ‘आयएसओ’च्या दृष्टीकोनातून निकषपात्र ठरल्या. त्यामुळे आता या अंगणवाड्यांना ‘आयएसओ’ दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उर्वरित अंगणवाड्यांच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित संस्थेने ठराविक कालावधी ठरवून दिला आहे. त्यानंतर संबंधित अंगणवाड्यांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित अंगणवाड्यांपैकी किती अंगणवाड्या ‘आयएसओ’साठी पात्र ठरतात. हे तपासणीनंतर समोर येणार आहे. (प्रतिनिधी)