शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगचा पास फक्त महिन्याच्या सुरुवातीलाच

By admin | Updated: September 28, 2014 00:18 IST

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात आधी दुपटीने वाढ करण्यात आली.

औरंगाबाद : रेल्वेस्थानकावरील पार्किंगच्या दरात आधी दुपटीने वाढ करण्यात आली. त्यानंतर आता पार्किंगचा मासिक पास काढायचा तर एक तारखेलाच येण्याचे पार्किंगचालकांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे दररोज तिकिटाच्या खर्चापेक्षा वाहनाच्या पार्किंगसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मागणीप्रमाणे मासिक पास न देता मनमानी पद्धतीने पैसे वसूल केले जात असल्याचे अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.औरंगाबाद रेल्वेस्थानकाहून रोज हजारो प्रवासी जालना, लासूरसह विविध ठिकाणांहून नोकरी, शिक्षणानिमित्त ये-जा करतात. आधीच रोजचा प्रवास महागल्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून वाहनाच्या पार्किंगसाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेस्थानकावरील पार्किंगमध्ये वाहन उभे करण्यासाठी दुचाकीसाठी सहा तासांसाठी १०, तर बारा तासांसाठी २० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. नोकरी, शिक्षणानिमित्त अपडाऊन करणारे प्रवासी स्थानकातील पार्किंगमध्ये वाहन उभे करतात. सहा तासांच्या आत परत येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना दररोज पार्किंगसाठी २० रुपये खर्च करावे लागत आहेत. दररोज २० रुपये याप्रमाणे महिन्याला किमान ६०० रुपये पार्किंगसाठी मोजावे लागत आहेत, तर पार्किंगचा महिन्याचा पास हा ४०० रुपयांचा आहे. महिन्याच्या ७ ते १५ तारखेपर्यंत वेतन होते; परंतु महिन्याच्या ३ तारखेनंतर मासिक पास दिला जात नाही. त्यामुळे पार्किंगसाठी जास्त पैसे मोजण्याची वेळ येत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पार्किंगच्या दरात झालेली वाढ मागे घेण्याबरोबर कोणत्याही तारखेला मासिक पास दिला पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.