शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्यावरुन दगडफेक

By admin | Updated: July 24, 2015 00:49 IST

परळी : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नावे असलेली पीकविम्याची रक्कम देण्यास दिरंगाई केली जात असल्याच्या कारणावरून काही जणांनी संतप्त होऊन

परळी : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या नावे असलेली पीकविम्याची रक्कम देण्यास दिरंगाई केली जात असल्याच्या कारणावरून काही जणांनी संतप्त होऊन परळी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेवर गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास दगडफेक केली. अचानक सुरू झालेल्या या दगडफेकीमुळे बँकेतील कर्मचारी घाबरून गेले. दुपारनंतर बाहेरून बँकेच्या कार्यालयास कुलूप लावण्यात आले होते. परळी मोंढा भागातील जिल्हा बँकेच्या परळी शाखेत गेल्या ८ दिवसांपासून पीक विम्याची रक्कम वाटप करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. परळी तालुक्यातील बेलंबा, दादाहरी वडगांव, भोपला येथील पात्र पीक विमा धारकांना विम्याची रक्कम देण्याचे काम चालू आहे. गुरूवारी पीक विम्याची व दुष्काळ अनुदानाची यादी शेतकऱ्यांना पहावयास मिळाली नाही. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या पाल्यांची पीक विम्याची रक्कम देण्यास दिरंगाई होत आहे. गुरूवारी सकाळी ११.३० वा. काही शेतकऱ्यांचे पाल्य मयत वडीलांच्या नावाने मंजुर झालेल्या पीक विम्याची रक्कम घेण्यासाठी बँकेत आले व त्यांनी पीक विम्याच्या रकमेची मागणी केली. कर्मचाऱ्यांनी त्यांना नोटरी करून आणण्याचे सांगितल्याने काही ते संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी बँकेच्या बाहेर जाऊन दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे बँकेतील कर्मचारी घाबरुन गेले. स्वत:चा बचाव करीत काही कर्मचाऱ्यांनी दरवाजा आतून बंद करुन घेतला.येथील शाखाधिकारी ३ दिवसाच्या वैद्यकीय रजेवर गेलेले असतांना सुध्दा या ठिकाणी इतर अधिकारी आले नाहीत. शुक्रवारपासून मोंढ्यातील बँकेच्या शाखेत पीक विम्याचा हप्ता स्विकारणे सुरू केले जाणार असल्याने या ठिकाणी कर्मचारी वर्ग वाढवावा व काऊंटरची संख्या वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. आतापर्यंत या शाखेतून दीड कोटी रूपये वाटप करण्यात आले आहेत व आणखी १ कोटी रूपयाच्या जवळपास रक्कम वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती परळी शाखेच्या सुत्रांनी दिली. पीकविमा वाटप प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे. (वार्ताहर)जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परळीतील शाखेत शुक्रवारपासून पीक विम्याचा हप्ता भरून घेतला जाणार आहे. परंतु या ठिकाणी केवळ एकच काऊंटर असून तीनच कर्मचारी आहेत. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांची गोची होत आहे. या ठिकाणी काऊंटरची संख्या वाढवावी व कर्मचारी वाढवावेत अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व कन्हेरवाडीचे शेतकरी ज्ञानोबा फड यांनी केली आहे. ४ भवानी नगर भागातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत गुरूवारी पिक विमा भरण्यास आलेल्या नागरीकांना कागदपत्रांचा तुटवडा भासला व या ठिकाणीही कर्मचाऱ्यांची संख्या व काऊंटर वाढविणे आवश्यक असल्याचे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांनी दगडफेक करणे हा चुकीचा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी रितसर बँकेची प्रोसिजर पूर्ण करुन पीक विम्याची रक्कम घेऊन सहकार्य करावे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचनेवरुन पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात येत आहे.- नितीन ढाकणे, संचालक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीड