शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्य सहलीवर!

By admin | Updated: September 12, 2014 00:26 IST

रमेश शिंदे , औसा औसा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे़ येत्या रविवारी सभापतीची निवड होणार आहे़ दरम्यान या निवडीनिमित्ताने पंचायत समितीचे काही सदस्य सहलीवर

रमेश शिंदे , औसाऔसा पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे़ येत्या रविवारी सभापतीची निवड होणार आहे़ दरम्यान या निवडीनिमित्ताने पंचायत समितीचे काही सदस्य सहलीवर गेले आहेत़ त्यामुळे सभापती कोण होणार याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना कायम लागून आहे़ औसा पंचायत समिती ही १८ सदस्यांची आहे़ यामध्ये काँग्रेसचे ६, शिवसेनेचे ६, भाजपा -३, राष्ट्रवादी काँग्रेस-३ असे पक्षीय बलाबल होते़ परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला सदस्याचे अकाली निधन झाल्यामुळे सध्या १७ सदस्य आहेत़ भाजप-शिवसेना युतीकडे ९ तर काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे ८ अशी सदस्य संख्या आहे़ सर्वसाधारण गटातून निवडून आलेल्या महिलामध्ये काँग्रेसकडे १ तर शिवसेनेकडे ३ अशी संख्या आहे़सध्या सभापतीपद शिवसेनेकडे आहे तर उपसभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे़ आता पुढील अडीच वर्षासाठी सभापती पद शिवसेनेकडे राहते की, काँग्रेस हिसकावून घेते याची उत्सुकता कायम आहे़ सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बहुतांश पंचायत समिती सदस्य हे सहलीवर गेले आहेत़ त्यामुळे आता कोण कोणास पाठींबा देतो आणि कुणाची सभापतीपदी वर्णी लागते याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे़ येत्या रविवारी या चर्चेस पूर्णविराम मिळणार आहे़मागील वेळी भाजपा-शिवसेना युतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन शिवसेनेच्या ठमुबाई आडे या सभापती तर राष्ट्रवादीचे दिनकर मुगळे हे उपसभापतीपदावर विराजमान झाले होते़ सध्या सभापती पदासाठी काँग्रेसच्या कोमल सूर्यवंशी, शिवसेनेच्या वर्षा गोरे, अनुसया मते, शोभा मोरे, या सर्वसाधारण गटातील महिला आहेत़ यापैकी कुणाची वर्णी लागेल याची उत्सुकता नागरिकांना आहे़ ४पंचायत समितीचे बहुतांश सदस्य सहलीवर गेल्यामुळे तर काहीचा संपर्कच होत नसल्यामुळे सभापती निवडीसंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे़ पंचायत समितीच्या आवारातही सभापती कोण होणार याची चर्चा ऐकावयास मिळत आहे़