शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरासोबत मालकीण पळाली

By admin | Updated: June 13, 2015 23:46 IST

शिरुर कासार : पुणे जिल्ह्यातून पळुन आलेले विवाहित जोडपे शिरुर कासार पोलिसांनी शनिवारी पकडले. महिलेच्या नातेवाईकांनीच त्यांना शोधून काढले.

शिरुर कासार : पुणे जिल्ह्यातून पळुन आलेले विवाहित जोडपे शिरुर कासार पोलिसांनी शनिवारी पकडले. महिलेच्या नातेवाईकांनीच त्यांना शोधून काढले. दरम्यान ज्या प्रियकरासोबत महिला पळाली, तो त्यांच्याकडे नोकर म्हणून कामाला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. पुणे येथून पळून आलेले दोघेही विवाहित आहेत. तरुणाचे वय ३५ असून त्याला पत्नी व तीन मुले आहेत तर ३० वर्षीय महिलेस पती व दोन मुले आहेत. ते दोघे पळून आल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी येरवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ते दोघे शिरुर कासार तालुक्यातील हाजीपूर येथे गेले. तेथे वास्तव्य करुन ते शनिवारी सकाळी शिरुरकडे आले. त्यांचा माग काढत नातेवाईक शिरुरकडे आले. रस्त्यावरुन जात असताना सदरील महिलेचे नातेवाईक व ग्रामस्थ त्यांच्या मागे लागले. त्यामुळे ते दोघे पळू लागले. थोड्या अंतरावर त्या महिलेस पकडण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस वेळीच पोहोचले व त्यांनी पाठलाग करुन त्या प्रियकरालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरिक्षक पारवे पाटील, पोलीस जमादार अविनाश सांदळे, राजाराम तांदळे, माने हे तेथे उपस्थित होते. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. चौकशी केली असता त्यांनी एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली पोलिसांजवळ दिली. त्यांची प्रेमकथा ऐकून पोलिसही थक्क झाले. तीन वर्षापूर्वी फुलले प्रेम प्रियकर तरुण त्या महिलेच्या घरी तीन वर्षापूर्वी कामाला होता. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलाबाळांचा विचार न करता दोघे एकमेकांखातर आणाभाका खात पळून आले होते. (वार्ताहर) शिरूरमध्ये सापडलेल्या पे्रमीयुगुलापैकी महिलेची हरवल्याची नोंद पुणे येथील येरवाडा ठाण्यात दाखल आहे. ४येथील पोलीस तिचा आधीपासूनच शोध घेत होते. ४ते दोघे शिरूरमध्ये एकत्रित आढळून आल्यामुळे आता त्यांना येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे, अशी माहिती उपनिरीक्षक पारवे पाटील यांनी ‘लोकमतला’ दिली.