संतापजनक! शिक्षेच्या बहाण्याने वर्गशिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे

By सुमित डोळे | Published: July 12, 2023 04:45 PM2023-07-12T16:45:14+5:302023-07-12T16:45:42+5:30

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शाळेची पोलिस उपायुक्तांकडे धाव, शिक्षक अटकेत

Outrageous! Class teacher sexually assaults girl students on the pretext of punishment | संतापजनक! शिक्षेच्या बहाण्याने वर्गशिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे

संतापजनक! शिक्षेच्या बहाण्याने वर्गशिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : वर्गशिक्षकानेच शिक्षेच्या बहाण्याने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली. मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्ट झाली. त्यानंतर यात विजय सीताराम हिवाळे (संघर्षनगर, मुकुंदवाडी) या शिक्षकाला तत्काळ अटक करण्यात आल्याचे उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी सांगितले.

मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळपास १२ शिक्षक, दोन शिक्षिका व २८० विद्यार्थी असलेल्या शाळेत हा प्रकार घडत होता. विजय हा इयत्ता पाचवीत गणित विषय शिकवत होता. त्यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी काही महिन्यांपासून तक्रारी सुरू केल्या होत्या. पंधरा दिवसांपूर्वी मुख्याध्यापकांनी त्यावरून मागच्या काही महिन्यांतील फुटेज तपासणे सुरू केले. त्यात ८ एप्रिल रोजी विजय छडी घेऊन विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नाहक मारताना दिसले, तर दोन मुलींना शिक्षा करण्याच्या बहाण्याने जवळ घेऊन अश्लील चाळे करत होते. याच विजयने सातवीच्या एका मुलाला खाली पडेपर्यंत मारहाण केली. मुख्याध्यापकांनी संस्थाचालकांना हा प्रकार कळवल्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवले. मुकुंदवाडीचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी यात विनयभंग, मारहाणीच्या कलमासह बाललैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर विजयला अटक करण्यात आली.

शाळांनी लक्ष ठेवावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
अनेकदा अशा तक्रारी शाळा, संस्थाचालक लपवण्याचा प्रयत्न करतात; परंतु शाळांनी समोर यावे. विद्यार्थी तक्रार करत असल्यास त्याची गांभीर्याने दखल घ्या. वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा.
-शिलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त.

Web Title: Outrageous! Class teacher sexually assaults girl students on the pretext of punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.