शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातूनही होतोय विरोध

By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST

वसमत : नगर परिषदेने कत्तलखाना उघडण्यासाठी निविदा मागवल्याने तालुकाभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

वसमत : नगर परिषदेने कत्तलखाना उघडण्यासाठी निविदा मागवल्याने तालुकाभरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील सरपंच व शेतकऱ्यांनीही या विरोधात अ‍ॅड. संदीप भालेराव मित्र -मंडळाच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. त्यामुळे कत्तलखाना प्रकरण आता चांगलेच तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वसमत नगरपालिकेने सर्वे नं. ३९ मध्ये बीओटी तत्वावर कत्तलखाना उभारणीसाठी निविदा काढल्या आहेत. निविदा नगरपालिकेला प्राप्तही झाल्या आहेत. या निविदा मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष कत्तलखाना निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र नगर पालिकेच्या या कत्तलखान्यास प्रचंड विरोध होत आहे. आजवर २० संघटनांनी या कत्तलखान्याविरोधात निवेदने दिली आहेत.
वसमत शहरातील नागरिक व कार्यकर्ते नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या निविदा काढल्याच कशा? असा प्रश्न करत आहेत.
शहरातील विरोध आता ग्रामीण भागातही होत आहे. अ‍ॅड. संदीप भालेराव मित्रमंडळाने यासाठी तालुक्यातील सरपंच व शेतकऱ्यांना एकत्रित करणे सुरू केले आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेदनात नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत कत्तलखाना रद्द करण्याचा ठराव पास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कत्तलखान्यामुळे गोवंश नष्ट होईल, तालुक्यातील पशुधन संकटात येईल, शेतकरी संकटात येतील, अशी भीती व्यक्त करून कत्तलखाना रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर संतोष भालेराव, रांजोना येथील सरपंच रामचंद्र साळवे, एकरूखा गावचे सरपंच गोविंदराव कदम, रेवूलगावचे सरपंच विश्वनाथराव फेगडे, विरेगावच्या सरपंच पंचफुलाबाई डुकरे, बळेगावच्या सरपंच धारुबाई नवले. तेलगावचे माजी सरपंच ईश्वर कानोडे, गजानन कदम, तुकाराम अंभोरे, नवनाथ पंठरकर, राम कातोरे, मुंजाजी साखरे, उमेश खाकरे, नारायण इंगोले, नरहरी फेगडे, दत्तराव नवले, नवनाथ पंठरकर, नितीन हंडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी व सरपंच कत्तलखान्याच्या विरोधात उतरल्याने हा लढा उग्र होत असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)