शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणचा कारभार ‘आॅफ लाईन’च

By admin | Updated: October 7, 2014 00:16 IST

बीड : समाजकल्याण विभागात लिपीकाला शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे प्रशिक्षण नसल्याने तर आॅनलाईन सेवेतील सर्व्हर डाऊन झाल्याने शिष्यवृत्ती मिळण्याकरीता आवश्यक असलेल्या

बीड : समाजकल्याण विभागात लिपीकाला शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे प्रशिक्षण नसल्याने तर आॅनलाईन सेवेतील सर्व्हर डाऊन झाल्याने शिष्यवृत्ती मिळण्याकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्राची पूर्तता होत नसल्याने अनेक विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून दुरावत आहे. समाजकल्याण विभागातील आॅनलाईन सेवा ही ‘आॅफ लाईन’ झाली असल्याचे दिसत आहे.समाजकल्याण विभागाने विहीत नमुन्यात आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. आॅनलाईन प्रक्रियेत सातत्याने बिघाड, तसेच अर्ज स्वीकृत करण्यासाठी विभागामार्फत लिपीकास कोणतेही प्रशिक्षण दिले नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. मागास व बहुजनातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून वेगवेगळे शिष्यवृत्ती विभाग तयार केले आहेत परंतु आॅनलाईन प्रक्रियेत सातत्याने बिघाड होत असल्याने संबंधित अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र इतर जिल्ह्यात ही आॅनलाईन सेवा सुरळीत चालू असल्याचे दिसून येत आहे. मात्र येथील समाजकल्याण विभागातच अधिक त्रास होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे.या गलथान कारभारामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत असल्याचा आरोप शैक्षणिक संघटनांमधून केला जात आहे. आॅनलाईन प्रक्रियेतील बिघाड त्वरीत दुरूस्त करून विद्यार्थ्यांना अद्यावत सेवा उपलब्ध करून द्याव्यात तसेच विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी समाजकल्याणने घ्यावी अशी मागणी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.यासंबंधी त्वरीत दखल न घेतल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविसिंह शिंदे यांनी दिला आहे.आॅनलाईन प्रक्रियेत जिल्ह्यातील काही आठ ते दहा महाविद्यालयांचा अभ्यासक्रम उपलब्ध नाही. या महाविद्यालांची माहिती घेऊन पुणे येथील आयुक्त कार्यालयात दाखल केली आहे. तरी आठ दिवसाच्या आत ही सेवा पूर्ववत अथवा दुसरी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त आर.एन.शिंदे यांनी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)