शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील मोठ्या धरणांमध्ये फक्त २२ दलघमी पाणी

By admin | Updated: June 9, 2016 23:54 IST

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या शेवटी मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती खूपच भीषण झाली आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ २२ दलघमी इतकाच जिवंत साठा शिल्लक आहे.

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या शेवटी मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती खूपच भीषण झाली आहे. विभागातील मोठ्या धरणांमध्ये सध्या केवळ २२ दलघमी इतकाच जिवंत साठा शिल्लक आहे. जायकवाडीसह इतर आठ मोठ्या धरणांमधील जिवंत साठा केव्हाच संपला असून, आता या धरणांमधील मृतसाठ्यातील पाण्यावरच विभागातील अनेक शहरांची तहान भागविली जात आहे.मराठवाड्यात मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे विभागातील धरणांमध्ये पुरेसा साठा होऊ शकला नव्हता. परिणामी यंदा जानेवारीपासून पाणीटंचाईचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण यंदा २६ मार्च रोजीच मृतसाठ्यात गेले. तेव्हापासून या धरणातील मृतसाठ्यातून औरंगाबाद, जालना, गेवराई आदी प्रमुख शहरांसह सुमारे अडीचशे गावांची तहान भागविली जात आहे. तसेच औद्योगिक वसाहतींसाठी मृतसाठ्यातूनच पाणी वापर सुरू आहे. दुसरीकडे येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न मनार, विष्णूपुरी या धरणांमधील जिवंत साठा संपला आहे. सध्या केवळ निम्न दुधना आणि पेनगंगा या दोन धरणांच्या जिवंत साठ्यात अवघे २२ दलघमी एवढे पाणी शिल्लक आहे. आठवडाभरात हे पाणीही संपण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जूनपर्यंत मराठवाड्यातील सर्व मोठ्या धरणांमधील जिवंत साठा शून्यावर येणार आहे. दरम्यान, मृतसाठ्यातून आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वापर झाला आहे. एकट्या जायकवाडी धरणातून आतापर्यंत सुमारे २२८ दलघमी पाणी उपसा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात आधी मृतसाठ्याची पातळी भरून जिवंत साठ्यात पाणी साचण्यासाठी बराच अवधी लागणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.