लाभ मिळाला १८ जणांनाच

By Admin | Updated: July 5, 2014 01:00 IST2014-07-05T00:47:47+5:302014-07-05T01:00:58+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ७२ हजार महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असताना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेचा या कालावधीत फक्त

Only 18 people got the benefit | लाभ मिळाला १८ जणांनाच

लाभ मिळाला १८ जणांनाच

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत ७२ हजार महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आल्या असताना सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेचा या कालावधीत फक्त १८ जोडप्यांनाच लाभ झाला आहे. यामुळे ही योजना आहे काय आणि नाही काय सारखेच आहे.
शासनाने १ एप्रिल २००७ रोजी सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना लागू केली. ही योजना दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी लागू आहे. या महिलांनी एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर मुलगा नसताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतल्यास जोडप्याला रोख रक्कम दोन हजार रुपये व मुलीच्या नावावर ८ हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र दिले जाते. दोन मुली असल्यास प्रत्येकी चार हजार रुपये दिले जातात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २००७ ते २०१४ पर्यंत ७२ हजार १४९ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्या. याच सात वर्षांत विभागाला सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेचा ४ लाख ४० हजार रुपयांचा निधी मिळाला. यापैकी १८ लाभार्थींनाच फक्त १ लाख ८० हजार रुपये मिळाले. योजनेची माहिती ग्रामीण भागात पोहोचत नसल्यामुळे दरवर्षी निधी परत जातो.

Web Title: Only 18 people got the benefit