शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची माहिती मिळणार आॅनलाईन

By admin | Updated: September 13, 2014 00:11 IST

परभणी : विधानसभा निवडणुकीची इत्यंभूत माहिती मतदारांना एका क्लिकवर मिळण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

परभणी : विधानसभा निवडणुकीची इत्यंभूत माहिती मतदारांना एका क्लिकवर मिळण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली असून, त्यासाठी एक वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांनी लोकसभा निवडणुकीची संपूर्ण माहिती वेबसाईटच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविली होती. नागरिकांना सर्वात जास्त उत्सूकता असते ती निकालाची. त्यामुळे निकालाचे देखील प्रती मिनिटाचे अपडेट या वेबसाईटवर टाकण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनाही निकालाची माहिती लगेच मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीचीही माहिती नागरिकांना व्हावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ६६६.स्रं१ुँंल्ल्री’ीू३्रङ्मल्ल२.ूङ्मे ही वेबसाईट कार्यान्वित केली आहे. या वेबसाईटवर माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची माहिती, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांची माहिती, निवडणुकीसाठी कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती, मतदार नियंत्रण कक्ष, मतदारसंघ निहाय एकूण मतदार, वाहतुकीचे नियोजन, मतदान केंद्र, खर्चाचे दरपत्रक, फिडबॅक याची सर्व माहिती या वेबसाईटवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विधानसभेसाठी कार्यरत असलेले निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकही देण्यात आले आहेत. तसेच शासनाचा स्वीप कार्यक्रम, मतदान दिवसाची माहिती, मतमोजणी दिवसाची माहिती येथे लवकरच मिळणार आहे. या वेबसाईटमुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातील प्रशासकीय माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध होणार आहे. (प्रतिनिधी)