शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहर बसच्या एक हजार फेऱ्या

By admin | Updated: March 14, 2016 00:54 IST

औरंगाबाद : शहरात १५ मार्चपासून आॅटोरिक्षांसाठी मीटर सक्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. याचा सर्वसामान्य प्रवाशांना मात्र, फटका बसणार आहे.

तक्रार बेदखल : जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा सल्लाचंद्रपूर : येथील गोंडकालीन पुरातन किल्ल्याची तोडफोड करण्यात आली. अतिक्रमणामुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे एनासियंट अ‍ँड आर्कियोलॉजीकल साईटस् अ‍ॅन्ड रिमेन्स अ‍ॅक्ट १९५८ अधिनियमानुसार किल्ल्याचे नुकसान व त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणासाठी दोषी असलेले पुरातत्त्व अधिकारी, आमदार व मनपा आयुक्तांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली होती. मात्र तक्रारीवरून २० दिवस लोटल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याउलट पोलीस यंत्रणेने जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी, असे पत्र देऊन राजेश बेले यांची बोळवण करण्यात आली आहे. इरई व झरपट नदीच्या संगमावरील भूभागावर वसलेल्या चंद्रपूर शहराची ख्याती पुरातन काळापासून आहे. शहरात दिमाखाने उभा असलेला किल्ला गोंडराजांनी १४६१ ते १५७२ या काळात बांधलेला आहे. पुरातन वास्तुकलेचा उत्कृ ष्ठ नमुना असलेला देखणा किल्ला व त्याचे परकोट असामाजिक तत्त्वांच्या कृत्याला बळी पडला आहे. काही नागरिकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी किल्ल्याच्या परकोटाची तोडफोड केली तर कुणी किल्ल्याच्या भिंतीवर घर बांधले. काहींनी घर बांधण्यासाठी किल्ल्याची भिंत तोडली. काही ठिकाणी किल्ल्याचा परकोट तोडून २० फुटांचा रस्ता तयार केला. महानगरपालिकाही या विषयात मागे नाही. मनपाच्यावतीने दोन ठिकाणी किल्ल्याच्या जागेवर शौचालय बांधले. केंद्र सरकारने पुरातन वास्तूचे जतन व्हावे, यासाठी विशेष अधिनियम तयार केला. त्यानुसार तक्रारीनंतर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा सल्ला देण्यात आले.