शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एमसीव्हीसीसाठी यंदा जुनाच अभ्यासक्रम

By admin | Updated: July 13, 2014 00:45 IST

औरंगाबाद : ‘एमसीव्हीसी’साठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा आदेश पुस्तकांअभावी संचालक कार्यालयाने रद्द केला असून पुढच्या वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.

औरंगाबाद : ‘एमसीव्हीसी’साठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा आदेश पुस्तकांअभावी संचालक कार्यालयाने रद्द केला असून पुढच्या वर्षीपासून नवीन अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. दरम्यान, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव मार्गी लागल्याबद्दल एचएससी व्होकेशनलच्या शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. ७ जुलै रोजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रकाश तराळे, उपाध्यक्ष जयंत भाभे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, उपसचिव रा.गो. जाधव यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील एमसीव्हीसी शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्होकेशनल विभागाच्या संचालकांनी यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर दाखल केला असून लवकरच त्यासंबंधी शासन आदेश जारी करण्याचे आश्वासन मंत्री टोपे यांनी बैठकीत दिले.या बैठकीत जनरल फाऊंडेशन कोर्सच्या शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेत शिथिलता आणून एम.कॉम., बी.एड. ही अर्हता कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात १५० रुपये वाढ करण्यात आली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २१०० वरून २५०० रुपये ग्रेड पे करावा, तसेच २४ वर्षांनंतर मिळणारी वेतनश्रेणी ही तीन शिक्षक, निदेशकामागे एकास देण्याची मागणीही मान्य करण्यात आली. या निर्णयाचे स्वागत व्होकेशनल टीचर्स असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष प्रा. मनोहर वानखडे, डॉ. के. एल. करकरे, प्रा. विजय पाटील, प्रा. सविता पिंपळवाडकर, अतिया सिद्दीकी, पौर्णिमा देसाई, प्रा. प्रकाश हमणे, प्रा. भीमसिंग राजपूत, प्रा. प्रदीप सोळंके, महादेव बडदे आदींनी केले.