शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

पाणी रे पाणी ! मराठवाडा वॉटरग्रीड योजना सरकारच्या लेखी मृगजळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 19:54 IST

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

ठळक मुद्देमराठवाडा वॉटरग्रीडच्या निविदांना धोरणात्मक ब्रेकसरकार १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासत आहे

- विकास राऊत

औरंगाबाद: राज्यात सरकार बदलताच मराठवाडा वॉटरग्रीड योजना धोरणाच्या कचाट्यात अडकली आहे. १९ महिन्यांपासून योजनेची व्यवहार्यता तपासण्याचा मुद्दा पुढे करून विद्यमान सरकारने सदरील योजनेच्या पहिल्या टप्प्यात काढलेल्या निविदाही गुंडाळून ठेवल्या आहेत. योजनेचे तोटे आणि फायदे सांगणारे वेगवेगळे मतप्रवाह असल्यामुळे ग्रीडची योजना सध्या ठप्प आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी मराठवाडा वॉटरग्रीडच्या कामाचे भूमीपुजन  करण्याचे नियोजन होते. २२ कोटींतून इस्त्रायलच्या कंपनीने डीपीआरचे काम पुर्ण केले. शेती, पिण्यासाठी, उद्योगांना लागणाऱ्या पाण्याचे नियोजन ग्रीडमध्ये करण्यात आले आहे. या कामासाठी पहिल्या टप्प्यात १० हजार ५९५ कोटी मंजूर केल्याचा दावा गेल्या सरकारने केला होता. जायकवाडी, उजनी, येलदरी, सिध्देश्वर, विष्णुपुरी, सीना कोळेगांव, माजलगांव, निम्न तेरणा, निम्न मनाड, ईसापूर, पेनगंगा हे ११ धरणे मोठ्या बंद जलवाहिनीने जोडून दुष्काळी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. ग्रीडमधील वापरण्यात येणाऱ्या जलवाहिनीचा व्यास चारचाकी कार जाईल एवढा मोठा असेल, असे सांगण्यात आले होते. इस्त्रायलच्या कंपनीने जिल्हानिहाय टेंडर काढले. परंतु पुढे निविदांना बे्रक लागला.

नवीन सरकार आल्यानंतर जानेवारी २०२० -२१ च्या मराठवाडा वित्त व नियोजन आढावा बैठकीत योजनेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. सरकार योजनेची व्यवहार्यता तपासेल, त्यानंतर पुढे जाईल, असे वित्त मंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर आजवरचा काळ आरोग्य उपाययोजनेत गेल्याने त्या योजनेसाठी सरकारी धोरण ठरले नाही. नेमके काय आहे वॉटरग्रीडच्या योजनेत  : १३३० कि.मी. लांबीची मुख्य जलवाहिनी, ११ धरणे एकमेकांशी जोडणे प्रस्तावित, प्रत्येक तालुक्यात पाणी देण्यासाठी ३२२० कि.मी.जलवाहिनी, पहिला टप्पा तरतूद १० हजार ५९५ कोटी रुपये, अशुध्द पाणी, मुख्य जलवाहिनीसाठी ३८५५ कोटींचा खर्च, २०५० पर्यंत ९६० दशलक्ष मीटर पाण्याची गरज, योजनेवरील पुर्ण खर्च सुमारे ४५ हजार कोटी

हा मराठवाड्यावर अन्याय आहेभाजपाचे राज्यसभा सदस्य खा.भागवत कराड यांनी राज्यसरकार आरोप केला. ते म्हणाले, हा राज्यसरकारकडून मराठवाड्यावर अन्याय आहे.१९ महिने सरकार योजनेची व्यवहार्यता तपासण्यात घालविल्यामुळे यापुढे ती योजना राबविण्यात येणाºया आर्थिक अडचणींना कोण जबाबदार असेल, असा सवाल त्यांनी केला. ४० ते ४५ हजार कोटींच्या बजेटची ती योजना आहे. काम पुर्ण झाल्यास विभागातील शेतकºयांना निश्चित फायदाच होईल.

शिवसेनेचे प्रत्युत्तर असेशिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत भाजपावर पटलवार केला. सरकार मराठवाड्यावर काहीही अन्याय करीत नाही. मराठवाडा वैधानिक विकास मंडळावर असतांना खा.कराड यांनी योजनेसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. सरकार वॉटरग्रीड योजनेबाबत आगामी काळात निश्चित निर्णय घेईल.

वॉटर ग्रीड योजना मराठवाड्यासाठी फायद्याचीचमराठवाडा वॉटर ग्रीड योजना ही विभागासाठी फायद्याचीच आहे. असे मत मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सद्स्य शंकर नागरे यांनी व्यक्त केले. योजनेबाबत  निगेटीव्ह सुर नसावा. या योजनेमुळे नाशिक कडून येणाºया धरणांचे ओव्हरफ्लो होणारे पाणी विभागात ग्रीडच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल. मध्यंतरी योजनेचे काम आणि निविदांबाबत विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. परंतु त्यानंतरही पुढे काही झाले नाही. योजना राबविणे सध्या महत्त्वाचे आहे. असेही नागरे म्हणाले. सदरील योजना व्यवहार्यच आहे. असा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबाद