पोषण आहार कामगारांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

By Admin | Updated: May 27, 2014 01:00 IST2014-05-27T00:43:51+5:302014-05-27T01:00:50+5:30

जालना : शालेय पोषण आहार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला

Nutritious workers workers protest against Zilla Parishad | पोषण आहार कामगारांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

पोषण आहार कामगारांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

जालना : शालेय पोषण आहार कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. या कामगारांनी अंबड चौफुलीपासून जिल्हा परिषद कर्यालयापर्यंत मोर्चा काढला. तेथे निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. कामगारांना नियमित मानधन मिळत नसल्याने उपासमार होत असून शासनाने २७ फेबु्रवारी २०१४ चा जी.आर. रद्द करावा, शालेय आहार कामगारांना सेवेत समाविष्ट करावे व तोपर्यंत १० हजार रुपये मानधन लागू करावे इत्यादी मागण्या मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या. मोर्चाचे नेतृत्व सीटूचे राज्य सेके्रटरी अण्णा सावंत, मराठवाडा शालेय आहार कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर मोकळे, सीटूच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनंदा तिडके यांनी केले. या मोर्चात गोविंद आर्दड, मारोती खंदारे, युनूस पठाण, राजू कांबळे यांच्यासह शालेय पोषण आहार कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nutritious workers workers protest against Zilla Parishad