नृसिंह भक्तात उत्साह संचारला

By Admin | Updated: May 13, 2014 01:02 IST2014-05-13T00:11:34+5:302014-05-13T01:02:33+5:30

पोखर्णी नृ. : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा आज साजरा होणार असून नृसिंह भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे.

Nrishingh Bhaktaa started the excitement | नृसिंह भक्तात उत्साह संचारला

नृसिंह भक्तात उत्साह संचारला

पोखर्णी नृ. : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा आज साजरा होणार असून नृसिंह भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या पाच दिवसांपासून भक्तगण नृसिंह भक्तीत तल्लीन झाले आहेत. यानिमित्त आयोजित हरिद्वार येथील मानस माधुरी साध्वी विश्वेश्वरीदेवी यांची संगीत भागवत कथा सुरु आहे. तसेच कीर्तन व भजनाचे कार्यक्रमही मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. नृसिंह परिसराची सजावट करण्यात आली असून भाविकांच्या स्वागतासाठी पोखर्णीकर सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविक पोखर्णीत दाखल होतात. नृसिंह मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून मंदिराची वेबसाईडही कार्यान्वित झाली आहे. भाविकांच्या निवासासाठी भक्त निवास तयार ठेवण्यात आले आहे. पंचक्रोशितील भाविकांसाठी हा महोत्सव म्हणजे आगळीवेगळी पर्वणी राहणार आहे. कार्यक्रमासाठी नृसिंह संस्थान व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. नृसिंह जन्मोत्सव (देवजन्म) १३ मे रोजी सायंकाळी ६.५१ वाजता साजरा होणार आहे. देवजन्माचे कीर्तन ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे होणार असून गुलालाची उधळण, नरहरी श्यामराज की जय चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. देवजन्मानंतर श्रींची वसंत पूजा व लघुरुद्र अभिषेक होऊन श्रींची मंदिरातच पालखी मिरवणूक निघते.१४ मे रोजी दुपारी २ ते ५ या वेळात महाप्रसाद होणार असून रात्री ८ वाजता पालखी मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघते. १५ मे रोजी सकाळी ६ वाजता ह.भ.प. वेदांतचार्य प्रल्हादशास्त्री दैठणकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. तर दुपारी कुस्त्यांच्या दंगली व नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे.

Web Title: Nrishingh Bhaktaa started the excitement