शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

'आता आमचे जमतेय, विखे शिर्डीतून आठवलेंना मदत करतील'; रिपाइं लोकसभेसाठी आशावादी

By शांतीलाल गायकवाड | Published: May 25, 2023 12:22 PM

शरद पवारांसोबत असताना विखे आमच्याशी काहीसे वेगळे वागले होते, आता मात्र ते आमच्या बाजूने आहेत, बाबूराव कदम

छत्रपती संभाजीनगर : जुने झाले गेले, आता आमचे जमतेय. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील रिपब्लिकन पार्टीचे शिर्डीतील लोकसभेचे उमेदवार, केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांना मदत करून विजयी करतील, असे मत रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी व्यक्त केले.

शिर्डीत येत्या २८ मे रोजी होणाऱ्या रिपाइं प्रदेश अधिवेशनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना बाबूराव कदम म्हणाले, शरद पवारांसोबत असताना विखे आमच्याशी काहीसे वेगळे वागले होते, आता मात्र ते आमच्या बाजूने आहेत. रिपाइं राज्यात लोकसभेच्या तीन जागा मागणार आहे. त्यातील एक शिर्डीची असून, तेथून रामदार आठवले उभे राहतील. उर्वरित दोन जागांमध्ये लातूर व मुंबईत एक जागेची आमची मागणी आहे. त्यासाठीच शिर्डीत आम्ही हे सतत दुसरे अधिवेशन घेत आहोत, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

अधिवेशनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याशिवाय पक्षाचे महासचिव अविनाश महातेकर, प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

राज्याच्या विस्तारात स्थान द्याराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातला असून, त्यात आम्हाला स्थान द्यावे, अशी मागणीही यावेळी कदम यांनी केली. पत्रकार परिषदेला दौलत खरात, किशोर थोरात, जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, दिलीप पाडमुख, विजय मगरे, मधुकर चव्हाण, ॲड. मनोज सरिन, लक्ष्मण हिवराळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAurangabadऔरंगाबादshirdiशिर्डीlok sabhaलोकसभाRamdas Athawaleरामदास आठवले