शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आता धर्मादाय संस्थांवर आयकर विभागाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:42 IST

धर्मादाय संस्थावर आयकराची अत्यंत करडी नजर असणार आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य आयकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.

औरंगाबाद : सामाजिक क्षेत्रातील जी कामे सरकार करू शकत नाही, किंवा यासाठी सरकारची संसाधने अपुरी पडतात, अशी कामे धमार्दाय संस्थांनी करणे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतचा अनुभव पाहता यात धमार्दाय संस्था मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरले असून त्यामुळे यापुढील काळात धर्मादाय संस्थावर आयकराची अत्यंत करडी नजर असणार आहे, असे प्रतिपादन प्रधान मुख्य आयकर आयुक्त प्रमोदकुमार गुप्ता यांनी केले.

आयकर विभाग औरंगाबाद व सीए असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी आयोजित केलेल्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुणे येथील मुख्य आयकर आयुक्त सरदारसिंह मीना, औरंगाबादचे संयुक्त धर्मादाय आयुक्त न्या. श्रीकांत भोसले, अतिरिक्त आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, औरंगाबाद सीए संघटनेचे अध्यक्ष रोहन आचलिया, गणेश भालेराव यांची उपस्थिती होती.

प्रमोदकुमार गुप्ता म्हणाले, केवळ औरंगाबाद विभागाने धर्मादाय संस्थांवर केलेल्या कारवायांमधून सुमारे १७० कोटी रुपयांचे करपात्र उत्पन्न शोधण्यात मागील वर्षात यश आले. त्यातून विभागाने तब्बल ६० कोटी रुपयांचा कर वसूल केला आणि ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. केवळ महाराष्ट्र मध्ये आठ लाख नोंदणीकृत धर्मादाय संस्था असूनदेखील केवळ काही हजार संस्था आयकर विवरणपत्र भरतात, ही चिंतेची बाब आहे. यासाठी आता कडक पावले उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकट्या औरंगाबाद विभागात मागील वर्षात केलेल्या कारवाईमुळे सुमारे अडीच हजार संस्थांनी नवीन आयकर विवरणपत्र दाखल केली असून हे विभागाच्या मोठे यश आहेत, असेही ते म्हणाले. सीएसआर म्हणजे कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याअंतर्गत दाखवण्यात येणाऱ्या देणग्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून त्यात कंपन्या व धमार्दाय संस्थांचा हात आहे. याबाबतीतही आयकर विभाग पुढील वर्षात कडक उपाययोजना व कारवाई करनार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीपकुमार साळुंखे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी सांगितले, चांगल्या संस्थांना मदत व नफेखोरी करणाºया संस्थांवर कारवाई, असे आयकराचे दुहेरी धोरण असून त्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट व इतरांनी विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.सरदारसिंह मीना यांनी धमार्दाय संस्थांच्या कलम १२ अ कलम ८० जी याबाबतीत येणा-या समस्यांचा ऊहापोह केला. धमार्दाय संस्थांच्या प्रतिनिधींना वारंवार त्यासाठी पुण्याला येऊ लागू नये, म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी ते यासाठी खास शिबिर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीकांत भोसले म्हणाले, धमार्दाय संस्था विशेषत: इस्पितळे यांनी गोरगरिबांसाठी खरोखर कार्य करावे, यासाठी कायद्याची सक्त अंमलबजावणी त्यांचे संचालनालय करीत आहे. अनेकदा आठवण देऊनही विवरणपत्र न भरणाºया हजारो संस्थांची नोंदणी रद्द केली.

रोहन अचलिया म्हणाले, मागील तीन वर्षात काळा पैसा बाहेर काढण्यासाठी व आयकर विवरणपत्र दाखल करणाºया संस्थांची संख्या वाढवण्यासाठी आयकर विभागाने केलेल्या सर्व प्रयत्नांना व राबवलेल्या सर्व मोहिमांना सीए असोसिएशन मदत केलेली आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून औरंगाबाद विभागात आयकर विभागाला फार मोठे यश मिळाले आहे. गणेश भालेराव यांनी आभार मानले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIncome Taxइन्कम टॅक्स