टंचाई आराखडा गांभीर्याने करण्याच्या सूचना

By Admin | Updated: December 18, 2015 23:29 IST2015-12-18T23:17:41+5:302015-12-18T23:29:07+5:30

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई आराखडा गांभीर्याने तयार करण्याचा आदेश देत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे.

Notice for the seriousness of the scarcity plan | टंचाई आराखडा गांभीर्याने करण्याच्या सूचना

टंचाई आराखडा गांभीर्याने करण्याच्या सूचना

हिंगोली : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणीटंचाई आराखडा गांभीर्याने तयार करण्याचा आदेश देत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी यात स्वत: लक्ष घातले आहे. तर देखभाल व दुरुस्ती आराखड्यातील गावांमध्ये लवकरच जि.प.तर्फे दुरुस्तीची कामेही सुरू केली जातील, असे सांगितले.
जि.प.कडे मागील वर्षीचे देखभाल व दुरुस्तीचे पाच कोटी रुपये पडून आहेत. यापैकी अडीच कोटी योजनांच्या दुरुस्तीवर खर्च करता येणार आहेत. तर पाणीपुरवठा योजनांची वीज कंपनीची देयके अदा करून प्रस्ताव सादर करणाऱ्या ग्रा.पं.ला पन्नास टक्के रक्कम देण्यास उर्वरित अडीच कोटी वापरले जाणार आहेत. यातही पाणीपुरवठा योजनांचे प्रस्तावच येत नाहीत.
२0 गाव प्रादेशिक योजनेच्या दुरुस्तीसाठी ७.८0 लाखांची मंजुरी देण्यात आली आहे. या गावांचा पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेतले जाणार आहे. इतरही प्रादेशिक योजना हस्तांतरित झाल्याने दुरुस्तीला प्राधान्य दिले जाईल. रखडलेल्या योजनांबाबत कठोर भूमिका घेत जेथे योजना समिती अथवा गुत्तेदारामार्फत पूर्ण होणे शक्य नाही, अशा ठिकाणी ते काम आहे त्या स्थितीत अंतिम करून नव्याने एजन्सी नेमण्याची प्रक्रियाही केली जाणार असल्याचे ते म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Notice for the seriousness of the scarcity plan