शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
3
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
4
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
5
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
6
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
7
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
8
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
9
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
10
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
11
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
12
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
13
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
16
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
17
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
18
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
20
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरातत्व’च नव्हे; स्थानिकांचीही पाठ !

By admin | Updated: September 12, 2014 00:26 IST

लातूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्याचा बोलबाला होत असला तरी इतिहासकालीन महत्व असलेल्या लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्षच आहे.

लातूर : पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात असल्याचा बोलबाला होत असला तरी इतिहासकालीन महत्व असलेल्या लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्षच आहे. शिवाय, स्थानिक पर्यटकही या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचे प्रमाण नगण्य आहे. उदगीर व औशाचा भुईकोट किल्ला व खरोसा लेण्यांच्या विकासाकडे कमालीचे दुर्लक्षच असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. ६९.३३ टक्के लोकांनी पर्यटनस्थळांचा विकास होत नसल्याचे मत या सर्वेक्षणातून नोंदविले आहे. तर ८.६७ लोकांनी विकास होत असल्याचे म्हटले आहे. तर २६.६७ टक्के लोकांनी काही प्रमाणात पुरातत्व खात्याचे लक्ष असल्याचे मत या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे. उदगीर व औशाचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. त्यामुळेच ही दोन्ही शहरे ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर खरोशातील लेण्यांमुळे या गावाची ओळख जागतिक स्तरावर आहे. परंतु, हा ऐतिहासिक ठेवा जपण्यात जसे स्थानिक कमी पडत आहेत, तसे पुरातत्व विभागही उदासीन असल्याचे चित्र आहे. या पर्यटनस्थळांच्या देखभाल दुरुस्ती व पर्यटकांच्या भेटीबाबत ‘लोकमत’ने लातूर शहर, औसा शहर आणि खरोसा गावातील १५० लोकांशी सर्वेक्षणाद्वारे संवाद साधला. लातूर जिल्ह्यातील औसा व उदगीर येथील भुईकोट किल्ल्यांना पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत का, या प्रश्नावर उदगीर किल्ल्याला १६ टक्के, तर औसा येथील किल्ल्याला ८४ टक्के लोकांनी पर्यटक भेटी देतात, असे मत नोंदविले आहे. तर ५० टक्के लोकांनी पर्यटक भेटी देत नसल्याचे म्हटले आहे. खरोसा लेणी आपण पाहिली आहे का, असाही प्रश्न सर्वेक्षणात विचारला होता. त्यात ६२ टक्के लोकांनी होय म्हटले आहे. तर ३८ टक्के लोकांनी ‘नाही’ या पर्यायावर टीकमार्क केली आहे. आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना पर्यटकांच्या ठिकाणी भेट देण्यासाठी नेले आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात ४० टक्के लोकांनी ‘होय’ म्हटले असून, ६० टक्के लोकांनी ‘नाही’ असेच नमूद केले आहे. या तिन्ही पर्यटनस्थळी सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, या प्रश्नावर ९ टक्के लोक ‘होय’ म्हणतात. तर ४० टक्के लोक ‘नाही’ म्हणतात. ५१ टक्के लोकांनी सोयी सुविधा काही प्रमाणात उपलब्ध असल्याचे मत नोंदविले आहे. पर्यटनस्थळांच्या देखभाल दुरुस्तीकडे पुरातत्व खात्याचे लक्ष आहे का, या प्रश्नाच्या उत्तरात केवळ ११ टक्के लोकांनी ‘होय’ म्हटले आहे. तर ६९ टक्के लोकांनी ‘नाही’चा शेरा दिला आहे. २० टक्के लोकांनी काही प्रमाणात पुरातत्व खात्याचे लक्ष असल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)औसा तालुक्यातील ५० टक्के लोकांनी आत जाऊन हा किल्ला पाहिला नाही. फक्त किल्ल्याच्या तटबंदीचे दर्शन घेतले आहे. तर खरोसा येथे असलेल्या लेण्यांजवळील डोंगरावर रेणुकादेवीचे मंदिर आहे. नवरात्र महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेला येथे यात्रा असते. त्यामुळे लेण्यांना ८० टक्के लोक भेटी देतात.उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. उदयगिरी किल्ल्यामुळे उदगीर शहर प्रसिद्ध आहे. या किल्ल्यावर १७६० ला लढाई झाली होती. किल्ल्यामध्येच उदागीरबाबांचे मंदिर आहे. उदगीरचा हा भुईकोट किल्ला यादव काळातला. लढाईसाठी या किल्ल्याचा फायदा झाला. निजामाला उदगीरातच नमविले गेले. पण त्याला कायमचे वेसन घालण्यात कमी पडलो. या किल्ल्यातून एक भुयारी मार्ग बीदरच्या किल्ल्यापर्यंत जातो. हा मार्ग अंदाजे ६० ते ७० कि.मी. लांब आहे. ४लातूर जिल्ह्याचा उदगीर एक तालुका. हे शहर उदयगिरी किल्ल्यामुळे प्रसिद्ध आहे. शिक्षणाच्या बाबतीतही पुढारलेले शहर असले तरी ऐतिहासिक ठेव्यामुळे या शहराची ख्याती सर्वदूर आहे. उदगीरचा भुईकोट किल्ला यादव काळातला. त्याचा लढाईसाठी फायदा झाला. निजामाला उदगीरातच नमविले असल्याचा संदर्भ आहे.औसा येथील भुईकोट किल्ला १४६० ते १४८० च्या सुमारास बांधण्यात आला. या किल्ल्यामध्ये लढाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. परंतु, इथे अनेक राजे-महाराजे, सरदार राहिले असल्याचा उल्लेख दस्तावेजात आहे. ५ हेक्टर ५३ आर क्षेत्र परिसर या किल्ल्याचा आहे. चोहोबाजूंनी दुहेरी तटबंदी व १२० फुट रुंदीचा खंदक, अनेक महाल, भुयारी मार्ग असणारा हा किल्ला आहे. औसा व खरोसा येथील काही लोकांशी सर्वेक्षणाव्यतिरिक्त संवाद साधला. त्यातील बऱ्याच जणांनी किल्ल्याला व लेण्यांना भेटी दिल्या नसल्याचे सांगितले. शिवाय, पुरातत्व खात्याकडून देखभाल व दुरुस्ती होत नसल्याची नाराजी व्यक्त केली. पर्यटकांसाठी तेथे सोय नसल्याने भेटी देण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करून पर्यटकांना आकर्षित करण्याची गरज असल्याची मागणीही औसा व खरोसा येथील नागरिकांनी केली.