शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 14:59 IST

औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव अखेर बदलले; आता ‘छत्रपती संभाजीनगर’ रेल्वे स्टेशन नावाने ओळखले जाणार.

छत्रपती संभाजीनगर : सुमारे तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करण्यात आले होते. मात्र, तेव्हा शहरातील रेल्वे स्टेशनचे नामांतर झाले नव्हते. आता आता अखेर तीन वर्षांनंतर रेल्वे स्टेशनचे नाव औपचारिकरित्या ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन’ करण्यात आले आहे. मध्य रेल्वेने शनिवारी (25 ऑक्टोबर) जारी केलेल्या निवेदनात या नाव बदलाची घोषणा केली. यासोबतच नव्या स्टेशनचा कोडही (CPSN) जारी करण्यात आला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला होता. शासनाच्या नामांतरच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्य सरकारला दिलेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. 

केंद्र आणि राज्य सरकारकडून मान्यता

त्यानंतर आता अखेर 'औरंगाबाद' रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर' रेल्वे स्टेशन करण्यात आले आहे. केंद्राच्या मंजुरीनंतर स्टेशनवरील औरंगाबाद नावाचे सर्व फलक पुसून, छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहेत. हे रेल्वे स्टेश दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत येते. केंद्रीय रेल्वेच्या निवेदनानुसार, प्राधिकरणाकडून या बदलाला मंजुरी देण्यात आली आहे. 

रेल्वे विभागाची अधिकृत माहिती

रेल्वे विभागाने निवेदनात स्पष्ट केले की, “‘Aurangabad’ हे नाव आता कोणत्याही अधिकृत रेल्वे व्यवहारात वापरले जाणार नाही. सर्व अधिकृत नोंदींमध्ये स्थानकाचे नाव ‘Chhatrapati Sambhajinagar’ असेच असेल.”

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Railway Station Renamed Chhatrapati Sambhajinagar After Central Government Approval

Web Summary : After three years, Aurangabad Railway Station is now officially Chhatrapati Sambhajinagar Railway Station. The Central Railway announced the name change and new station code (CPSN) after state government and Supreme Court approvals. All records will reflect the new name.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा