शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

रॉयल्टीचा भरणा नाही

By admin | Updated: May 29, 2015 01:04 IST

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही

औरंगाबाद : शहरालगतच्या हर्सूल तलावातून रोज चारशेपेक्षा जास्त ट्रक गाळ आणि माती उकरून नेली जात आहे. त्यासाठी मनपाकडे कोणतीही रॉयल्टी भरली जात नाही. गाळ आणि माती नेणाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांपेक्षा वीटभट्टीचालकांचीच संख्या अधिक आहे. मनपाच्या मालकीच्या असलेल्या हर्सूल तलावातून शहरातील अकरा वॉर्डांना पाणीपुरवठा होतो. यंदा हा तलाव डिसेंबरअखेरीसच कोरडा पडला आहे. त्याचा फायदा तलावालगतच्या वीटभट्टीचालकांकडून घेतला जात आहे. हे वीटभट्टीचालक जेसीबी लावून दररोज शेकडो ट्रक गाळ आणि माती उकरून नेत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली हा गाळ नेला जात आहे. पण त्यासाठी या लोकांनी पालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. तसेच पालिकेकडे रॉयल्टीही भरली जात नाही. शेतकरी, भट्टीचालकांमध्ये संघर्षतलाव कोरडा पडल्यानंतर अनेक शेतकरी त्यात टरबूजाची लागवड करतात. यंदाही शेतकऱ्यांनी तलावाच्या समोरच्या भागात अशी लागवड केलेली आहे. गाळ आणि माती काढताना टरबूजाचे नुकसान होते. त्यामुळे या कारणावरून वीट्टभट्टीचालक आणि शेतकरी यांच्यात सातत्याने खटके उडत आहेत. वीट्टभट्ट्यांसाठी गाळ आणि मातीची मोठ्या प्रमाणावर गरज असते.तलाव कोरडा पडल्याचा फायदा घेत अनेक भट्टीचालक वर्षभराचा साठा करून ठेवत आहेत. त्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने ट्रक, ट्रॅक्टर भाड्याने लावले आहेत.