शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टफिल्मसाठी प्रखर बुद्धिमत्ता आवश्यक - महाजन

By admin | Updated: March 26, 2016 23:50 IST

औरंगाबाद : तीन तासांचा चित्रपट बनवणे एकवेळ सोपे असते; परंतु कमी वेळेत मोठा संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते,

औरंगाबाद : तीन तासांचा चित्रपट बनवणे एकवेळ सोपे असते; परंतु कमी वेळेत मोठा संदेश देणाऱ्या शॉर्टफिल्म बनवण्यासाठी प्रखर बुद्धिमत्ता लागते, असे मत प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. कमलेश महाजन यांनी ‘औरंगाबाद क्लॅप शॉॅर्ट फिल्म फेस्टिव्हल’च्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. क्लॅप फिल्म फाउंडेशन आणि गाथा बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तापडिया नाट्य मंदिर येथे या फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिव कदम, प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. संजय देवळाणकर, सत्यजित खारकर यांच्यासह रा. रं. बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उदयोन्मुख कलाकारांच्या कलेला वाव देण्यासाठी लघुचित्रपट बनवणाच्या कार्यशाळा आयोजित कराव्यात असा मुद्दाही महाजन यांनी उपस्थित केला. उद्घाटनप्रसंगी बोेलताना दिग्दर्शक शिव कदम म्हणाले की, मागची पिढी शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होत होती; परंतु आताच्या तरुण मनातील घुसमट बाहेर आणण्याचे काम शॉर्टफिल्म करत आहे. तुटपुंज्या साधनसामग्रीचा वापर करून अप्रतिम शॉर्टफिल्म बनवणाऱ्या दिग्दर्शकांचे आणि लेखकांचे कदम यांनी मनापासून कौतुक केले. त्याचबरोबर या फेस्टिव्हलमध्ये बक्षीस मिळवणाऱ्या कलाकारांसोबत काम करण्याचे आश्वासनही दिले. उद्घाटनानंतर सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या तसेच परखडपणे विचार मांडणाऱ्या शॉर्टफिल्म्स दाखवण्यात आल्या. या फिल्म शहर व देशभरातील कलाकारांतर्फे बनवण्यात आल्या होत्या. आजच्या सत्रात ‘रिसायकल’, ‘अक्स’, ‘१५ आॅगस्ट’, ‘एल अ‍ॅण्ड एफ फॉरएव्हर’, ‘आयडेंटीटी’, ‘बी ह्युमन’ यांसारख्या २२ शॉर्टफिल्म्स दाखवण्यात आल्या. प्रास्ताविक विनय जोशी यांनी केले. किशोर निकम यांनी आभार मानले. रविवारी सकाळी १० वाजेपासून तापडिया नाट्य मंंदिरात लघुचित्रपट दाखवण्यात येणार आहे. सायं. ५ वा. या महोत्सवाचा समारोप असून चित्रपट गीतकार तसेच लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते विजयी कलाकारांना पारितोषिके देण्यात येतील. प्रा. अभिजित देशपांडे, प्रा. संजय देवळाणकर, सत्यजित खारकर या परीक्षण करणार आहेत.