दोन हजारांवर निराधारांची हेळसांड

By Admin | Updated: February 10, 2015 00:31 IST2015-02-09T23:49:14+5:302015-02-10T00:31:48+5:30

बीड : संजय गांधी योजना तसेच श्रावण बाळ योजने अंतर्गत निराधारांना आधार मिळावा, यासाठी बीड तहसिल कार्यालयाच्या वतीने दोन हजार

Nearer of two thousand people | दोन हजारांवर निराधारांची हेळसांड

दोन हजारांवर निराधारांची हेळसांड


बीड : संजय गांधी योजना तसेच श्रावण बाळ योजने अंतर्गत निराधारांना आधार मिळावा, यासाठी बीड तहसिल कार्यालयाच्या वतीने दोन हजार प्रकरणे निकाली काढण्यात आले. मात्र राज्य शसनाकडूनच मंजूर झालेल्या निराधारांना मानधन मिळत नसल्याचे सोमवारी जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सचिव दिलिप भोसले यांनी सांगितले.
बीड तालुक्यात श्रावण बाळ योजना तसेच संजय गांधी योजनेचे मिळून २१ हजाराच्या जवळपास लाभार्थी आहेत. मागील सहा महिन्यापूर्वी आलेल्या तीन ते साडेतीन हजार अर्जापैकी दोन हजाराच्या जवळपास निराधार, परितक्त्या लाभार्थी महिलांच्या फाईलला मंजुरी देण्यात आलेली आहे.
मंजूर देऊन तीन ते चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. तरी देखील महिलांच्या खात्यावर मानधन जमा होत नाही. याबाबत मागील आठ-दहा दिवसात तहसिल कार्यालयांकडे तक्रारी वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Nearer of two thousand people