क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)

Myles Davis 6 wickets in 6 balls Video: कुठे झाला सामना? कुणी केला हा खास विक्रम? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:34 IST2026-04-29T12:33:49+5:302026-04-29T12:34:51+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
watch 6 wickets in 6 balls england cricketer Myles Davis scripts history says its still bit surreal video viral | क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)

क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)

Myles Davis 6 wickets in 6 balls Video: क्रिकेटच्या इतिहासात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी घटना नुकतीच इंग्लंडमध्ये घडली. एका वेगवान गोलंदाजाने सलग ६ चेंडूंवर ६ गडी बाद करून 'डबल हॅट्ट्रिक'सह जागतिक विक्रम प्रस्थापित केला. मायल्स डेव्हिस (Myles Davis) असे या गोलंदाजाचे नाव असून त्याने त्याच्या ६ चेंडूत अवघा खेळच पालटून टाकला.

मायल्स डेव्हिसने ६ चेंडूत घेतले ६ बळी

इंग्लंडचा युवा गोलंदाज मायल्स डेव्हिस (Myles Davis) याने हा ऐतिहासिक पराक्रम केला. तो 'पेनक्रिज क्रिकेट क्लब' (Penkridge Cricket Club) कडून खेळत होता. 'साउथ स्टॅफोर्डशायर काउंटी लीग प्रीमियर डिव्हिजन' अंतर्गत पेलसॉल क्रिकेट क्लब (Pelsall Cricket Club) विरुद्ध झालेल्या सामन्यात ही घटना घडली. पेलसॉलचा संघ विजयासाठी १६९ धावांचा पाठलाग करत असताना ४९ धावांवर २ बाद अशा स्थितीत होता. मग डेव्हिस गोलंदाजीला आला. त्याने षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन बळी टिपले. त्यानंतर चाहत्यांनी हॅटट्रिक अपेक्षा व्यक्त करत मोबाईलमध्ये शूटिंग सुरू केले. त्यानंतर त्याने नव्या षटकाच्या पुढील चार चेंडूत बाद केले. त्यामुळे पेलसॉल क्रिकेट क्लबची धावसंख्या थेट ९ बाद ४९ धावांवर पोहोचली.

या ऐतिहासिक कामगिरीनंतर प्रतिक्रिया देताना मायल्स डेव्हिस म्हणाला, "हे अजूनही स्वप्नवत वाटत आहे (Surreal), पण हा एक अद्भुत टप्पा आहे. चौथ्या विकेटनंतर मला काय वाटत होते हेच समजत नव्हते, पण विकेट्स मिळणे सुरूच राहिले."

जागतिक विक्रम

पेनक्रिज क्लबचे अध्यक्ष जॉन प्राईस यांच्या मते, असा पराक्रम आतापर्यंत जगात केवळ ७ वेळा घडला आहे आणि यूकेमध्ये प्रौढ पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. डेव्हिसने ६ षटकांत १६ धावा देऊन एकूण ७ बळी टिपले. विशेष बाब म्हणजे, व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेला मायल्स हा सामना खेळणार नव्हता, मात्र त्याच्या एका सहकाऱ्याने त्याच्या कामाची शिफ्ट बदलल्यामुळे तो मैदानावर उतरू शकला. डेव्हिसच्या या कामगिरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, क्रिकेट जगतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Web Title : क्रिकेट इतिहास: गेंदबाज ने 6 गेंदों में 6 विकेट लिए!

Web Summary : पेनक्रिज क्रिकेट क्लब के लिए खेलते हुए मायल्स डेविस ने छह गेंदों में छह विकेट लेकर एक दुर्लभ उपलब्धि हासिल की। उन्होंने पेलसॉल क्रिकेट क्लब के खिलाफ खेल को बदल दिया, और 'डबल हैट्रिक' बनाई। विश्व स्तर पर ऐसा केवल सातवीं बार हुआ है, और यूके में वयस्क पुरुषों के क्रिकेट में पहली बार।

Web Title : Cricket History: Bowler Takes 6 Wickets in 6 Balls!

Web Summary : Myles Davis, playing for Penkridge Cricket Club, achieved a rare feat by taking six wickets in six balls. He shifted the game against Pelsall Cricket Club, achieving a 'double hat-trick'. This is only the seventh time globally, and a first in UK adult men's cricket.