राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

By Admin | Updated: May 30, 2014 00:35 IST2014-05-29T23:55:26+5:302014-05-30T00:35:25+5:30

हिंगोली : माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला

NCP activists cheered | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

 हिंगोली : माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल राकाँच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला. हिंगोली शहरातील गांधी चौकात गुरूवारी सायंकाळी राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी खा. शिवाजी माने, नगरसेवक जगजीतराज खुराणा, बाबुराव कदम, आमेरअली, गणेश लुंगे, शरद जयस्वाल, नगरसेविका सुरेखा जयस्वाल, केशव नाईक, अनिल पतंगे, माधव कोरडे, जि. प. सदस्य संजय दराडे, राजू पाटील, शिवाजी ढाले, मनिष आखरे, आरेफ लाला, शेख सदील आदी उपस्थित होते. कळमनुरी येथे बसस्थानकासमोर राकॉं कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी हुमायून नाईक, म. नाजीम रजवी, अभिजीत देशमुख, कैलास खिल्लारे, शेख मुस्ताक, बाबु कुरेशी, गजानन वानखेडे, विठ्ठल गाभणे, उमेश गोरे आदी उपस्थित होते. सेनगाव येथे राकाँ कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्टÑवादीचे विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, प्रताप अवचार, जगन्नाथ देशमुख, दत्ता देशमुख, पंजाबराव कुंदर्गे, भगवान चिलगर, माधवराव देशमुख, भारत लोखंडे, जीवन बुद्रुक, रामा जाधव, जितू देशमुख, अनंता देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: NCP activists cheered