शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिरात नवचंडी यज्ञ

By admin | Updated: October 3, 2014 00:32 IST

तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवात गुरूवारी दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली होती.

तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवात गुरूवारी दुर्गाष्टमीनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार विशेष महापूजा मांडण्यात आली होती. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दरम्यान, सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पुजेस प्रारंभ झाा. त्याच वेळी सात वाजता होमकुंडावर नवचंडीच्या यज्ञासही सुरूवात झाली.या यज्ञासाठी व नवग्रहाचे पूजन करण्यासाठी यजमान म्हणून धार्मिक विधीसाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे सपत्नीक उपस्थित होते. पाच तासाच्या पुजेनंतर दुपारी सव्वाबारा वाजता होमावरील पुर्णाहुती सोहळा पार पडला. या होमहवनाचे पौरोहित्य सरकारी उपाध्ये बंडोपंत पाठक, नागेश अंबुलगे, श्रीराम अपसिंगेकर, राजू प्रयाग, अनंत कांबळे यांच्यासह विनीत कोंडो, मकरंद प्रयाग आदींनी केले. यानंतर श्री तुळजाभवानी मातेची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात तुळजाभवानीने सहदेवतांची शक्ती घेऊन आक्रमक रूप धारण करून महिषासुराचा त्रिशुळाने वध केल्याची ही पूजा होती. या पुजेचे दर्शन घेून भाविक ‘आई राजा उदो उदो, सदानंदिचा उदो उदोऽऽऽ’ असा जयघोष करीत मंदिरातून बाहेर पडत होते.यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, भोपे पुजारी, पाळीकर पुजारी, उपाध्ये, सेवेकरी, आराधी, व्यवस्थापक तहसीलदार सुजीत नरहरे, सहाय्यक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, मंदिर सुरक्षा प्रमुख, पोलिस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गाष्टमीनिमित्त शहरवासिय व पुजाऱ्यांनी आपापल्या घरी आठ कुमारीकेचे पान-सुपारी, फळ, दक्षिणा व दूध देऊन पूजन केले. शुक्रवारी होमकुंडावर खंडेनवमीनिमित्त दुपारी बारा वाजता धार्मिक विधी होऊन घटोत्थापन होणार आहे. (वार्ताहर)