शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नाथषष्ठीची जय्यत तयारी

By admin | Updated: March 26, 2016 23:51 IST

पैठण : नाथषष्ठी सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शनिवारी (दि.२६) शहरातून संचलन केले.

पैठण : नाथषष्ठी सोहळ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी शनिवारी (दि.२६) शहरातून संचलन केले. ‘भानुदास-एकनाथ’ नामाचा गजर करीत शेकडो दिंड्या पैठणकडे आगेकूच करीत असून रविवारी (उद्या) दुपारनंतर दिंड्या पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. पैठण -औरंगाबाद , पैठण -पाचोड ,पैठण -शेवगाव आदी मार्गांसह विविध मार्गांवरून नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दिंड्या मार्गक्रमण करीत आहेत. काही दिंड्यांनी पैठण तालुक्यात प्रवेश केला आहे. आपल्या नियोजित मुक्कामाच्या गावी थांबलेल्या दिंड्यांचा पाहुणचार मोठ्या श्रद्धेने ग्रामस्थ करीत आहेत. मुक्कामी थांबलेल्या दिंड्यांच्या टाळ-मृदंग व हरिनामाच्या गजराने गावागावात भक्तिमय वातावरण ओसंडून वाहत आहे . यंदा रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या दिंड्या व त्यात सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत असल्याने प्रशासन जय्यत तयारीस लागले आहे. वारकरी मुक्कामी थांबत असलेल्या गोदावरीत यंदा पाणी नसल्याने वारकऱ्यांना प्रथमच गोदास्नानास मुकावे लागणार आहे . स्नानासाठी नगर परिषदेतर्फे जवळपास ५०० नळ गोदावरी पात्रात लावण्यात आले असून, टँकरनेसुद्धा पाणी पुरवठा करण्यात येईल, असे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी सांगितले. गोदावरी पात्राची व शहरात मुक्कामी जागा असलेल्या स्थळांची स्वच्छता करण्यात आली आहे. अग्निशमन, आरोग्य, दूरसंचार आदींची कामे पूर्ण झाल्याचे तहसीलदार किशोर देशमुख यांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बच्चनसिंह व पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी सांगितले.