शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

गोदा स्वच्छतेसाठी नांदेडकर सरसावले

By admin | Updated: June 11, 2014 00:23 IST

नांदेड : गोदा मैली झाल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे़ तिच्या स्वच्छतेसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रमही घेण्यात आले़

नांदेड : गोदा मैली झाल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे़ तिच्या स्वच्छतेसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रमही घेण्यात आले़ त्यात पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गोदावरीच्या स्वच्छतेसाठी नांदेडकरांनी दाखविलेला उत्साह अवर्णनीय होता़ श्रमदानातून गोळा झालेल्या १५ टन कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे पाहताच अनेकांना जणू श्रमपरिहारच झाल्याची भावना निर्माण झाली होती़ शहरासाठी ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक देणगीची समृद्धी लाभलेल्या गोदावरी नदीपात्राची स्वच्छता करुन सोमवारी नगीनाघाट परिसरात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला़ जिल्हा प्रशासन, मनपा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, गुरुद्वारा बोर्ड, लंगरसाहिब गुरुद्वारा, नांदेड नेचर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या या उपक्रमात १५ टन घाण श्रमदानाच्या माध्यमातून गोदावरीच्या बाहेर काढण्यात आली़ सकाळच्या आल्हाददायक वातावरणात गोदावरीच्या स्वच्छतेसाठी हजारो हात झटत होते़ त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि कृतज्ञतेचे भावही स्पष्टपणे झळकत होते़ त्यात नागरिक, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण यांनी उत्स्फूर्तपणे या स्तुत्य उपक्रमात खारीचा वाटा उचलला़ यावेळी संतबाबा बलविंदरसिंघजी, जिल्हाधिकारी धीरजकुमार, आयुक्त जी़ श्रीकांत, वनपरिक्षेत्र अधिकारी सुजय दोडल, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक रणजितसिंघ चिरागिया, उपायुक्त राजेंद्र खंदारे, सहाय्यक आयुक्त डॉ़ विजयकुमार मुंडे, एस़ टी़ मोरे, नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, गोविंद बिडवई, डॉ़मिर्झा बेग, कोतुलवार, शेख, मनीषा अय्यर, नेचर क्लबच्या अध्यक्षा अरुंधती पुरंदरे, अतिंद्र कट्टी, श्रीनिवास औंधकर यांची उपस्थिती होती़ यावेळी वड, पिंपळ, कांचन, उंबर, आवळा आदी ५० झाडे लावण्यात आली़ या झाडांच्या देखभाल व सुरक्षिततेची जबाबदारी गुरुद्वारा लंगर साहिब व गुरुद्वारा बोर्ड यांनी स्वीकारली़ (प्रतिनिधी)पर्यावरण दिनानिमित्त नांदेडकरांचा स्तुत्य उपक्रमपंधरा टन कचरा आणि घाण काढली पात्राच्या बाहेरनदीकिनारी वृक्षारोपणही केले