शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'नागपूर दंगल सरकार पुरस्कृत'; मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 17:17 IST

मनोज जरांगे यांची फडणवीस सरकारवर वेरूळ येथून कडाडून टीका

खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकार जातीय दंगली घडवतेय. नागपूर दंगल ही सरकार पुरस्कृत असल्याची टीका मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज मंगळवारी वेरूळ येथे माध्यमांशी बोलतांनी केली आहे. 

वेरूळ येथे शहाजीराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त मनोज जरांगे हे वेरूळ येथे आज आले होते. सोमवारी रात्री नागपूर येथे दोन समाजात झालेल्या राड्यामुळे पोलीस हाय अलर्टवर आहेत. याबाबत जरांगे यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकार सर्व परिस्थितीस जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. जरांगे म्हणाले की, मॉ जिजाऊ व छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे कोरटकर, सोलापूरकर यांना का अटक केली नाही? असा सवाल करत जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. तसेच नागपूरमध्ये सोमवारी रात्री राडा झाला. यावर देखील टीका करत ही दंगल सरकार पुरस्कृत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व घडवले जात आहे, असा हल्लाबोल जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

दोन्ही सरकार तुमचेदरम्यान, केंद्र व राज्य सरकार तुमचे असून औरंगजेब कबर तुम्ही काढायची तर काढू शकता. मात्र सरकारला राज्यात आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दंगली घडवायच्या आहे असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

औरंगजेब कबरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेटिंगदरम्यान, औरंगजेब प्रकरणावरून देशभरात मोठा गदारोळ होत असून कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्ववादी संघटनेने दिल्यामुळे खुलताबाद शहरात औरंगजेब कबर परिसरातील दर्गेला चोहोबाजूंनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तर खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यावर बॅरीकेट लावून प्रत्येक वाहनांची, पर्यटकांची आणि नागरिकांची चौकशी पोलीस करत आहेत. औरंगजेब कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे नाव नंबर, आधार कार्ड तपासले जात असून त्याची नोंद घेतली जात आहे. तसेच कबर परिसरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस