शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
2
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
3
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
4
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
5
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
6
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
7
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
8
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
9
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
10
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
11
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
12
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
13
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
14
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
15
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
16
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
17
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
18
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
19
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
20
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
Daily Top 2Weekly Top 5

नगर पंचायतींची अंमलबजावणी लांबणीवर?

By admin | Updated: August 24, 2014 00:11 IST

संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर

संजय कुलकर्णी ,जालना जिल्ह्यात चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा देण्यात येणार आहे. मात्र त्याबाबतची अंमलबजावणी आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांचा समावेश आहे. त्यापैकी जालना, अंबड, भोकरदन व परतूर येथे नगरपालिका अस्तित्वात आहेत. मात्र बदनापूर व जाफराबाद या जुन्या तसेच मंठा व घनसावंगी या गेल्या पंधरा वर्षात झालेल्या नवीन तालुक्याच्या ठिकाणी अद्यापही ग्रामपंचायती आहेत. शासनाच्या निर्णयानुसार या चारही ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा मिळणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीचा, ग्रामसभेचा व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. त्यामुळे आता नगर पंचायतींची अंमलबजावणी केव्हा होणार, याची चर्चा उत्सुकतेने या भागात होत आहे. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी काही दिवसांपूर्वीच या चारही ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांची बैठक घेऊन ग्रामपंचायतींना आता नगर पंचायतींचा दर्जा मिळणार असल्याने त्यासाठीची पूर्वतयारी करण्याची सूचना केली. ग्रामपंचायतीचे उत्पन्न, खर्च, कर्ज, मालमत्तासंबंधीची माहिती तसेच अन्य आवश्यक बाबींचे संकलन करून एकत्रित माहिती सादर करावी, असेही सांगण्यात आले. नगर पंचायतींचा दर्जा मिळणार असल्याने बदनापूर, जाफराबाद, घनसावंगी व मंठा येथील स्थानिक लोकप्रतिनिधीही जोमाने कामाला लागले आहेत. तर जिल्हा परिषद सदस्य आपले पद जाणार किंवा नाही, याबाबतची चाचपणी करत आहेत. नगर पंचायतींमुळे आगामी काळात शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याने या भागातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. नगर पंचायतींच्या अस्तित्वामुळे काही जिल्हा परिषद सदस्यत्वांचे पद जाणार, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. मात्र ज्या चार ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा दिला जाणार आहे, तेथील जि.प. सदस्यांचे पद जाईलच असे नाही. ग्रामपंचायती असलेल्या गावाची लोकसंख्या त्या तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत अधिक असेल तर पद जाणार नाही, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र, तरीही काही सदस्यांमध्ये भीती कायम आहे.