शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गूढ आवाजाने शिरूरसह परिसर हादरला

By admin | Updated: July 22, 2014 23:15 IST

शिरूरकासार : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळी गूढ आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते.

शिरूरकासार : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळी गूढ आवाज झाला. यामुळे नागरिक भयभीत झाले होते. गेल्या वर्षभरापासून शिरूरसह तालुक्यात सातत्याने गूढ आवाज ऐकू येत आहेत. हे आवाज भूृगर्भातून येत असून तब्बल वीस ते पंचवीस कि.मी. पर्यंत आवाज ऐकू जातो. सोमवारी सकाळीही साडेदहा ते ११ च्या सुमारास असाच गूढ आवाज ऐकू आला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकदा गूढ आवाज होऊन घरातील संसारोपयोगी वस्तूही हादरतात. शिरूर तालुक्यात डोंगर माथ्यांचा परिसर आहे. यामुळे नेमका आवाज कशाचा होतो याची चिंता नागरिकांना आहे. गेल्या काही दिवसात दहशतवादाचा संबंध बीड जिल्ह्यातील काही लोकांशी आल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अधिकच चिंता लागते. शिरूर तालुक्यात बॉम्ब बनविले जात आहेत का? किंवा इतर काही अनुचित प्रकार घडत आहेत का? अशा चर्चा नागरिकांतून चौकाचौकामध्ये होत आहेत. येथे सातत्याने गूढ आवाज येत असला तरी प्रशासन गंभीर भूमिका घेत नसल्याने नागरिकांमधूच नाराजीही व्यक्त केली जात आहे.सोमवारी सकाळी झालेल्या गूढ आवाजाबाबत तहसीलदार भारत सूर्यवंशी म्हणाले की, झालेल्या गूढ आवाजाची रीतसर नोंद घेण्यात येणार आहे व याबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात येणार आहे. (वार्ताहर)