शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम, दलित मतदारांचा भाजपालाच कौल

By admin | Updated: May 18, 2014 00:47 IST

दिनेश मुळवे , बीड लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराने मुसंडी मारली.

 दिनेश मुळवे , बीड लोकसभा निवडणुकीत बीड विधानसभा मतदारसंघातही भाजप उमेदवाराने मुसंडी मारली. येथील मुस्लिम, दलित मतदारसंघ आपल्याच वळचणीला असल्यागत गप्पा मारणार्‍यांची या निकालाने मात्र नशा उतरविली. या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनीही भाजपलाच साथ दिल्याचे निकालानंतर समोर आले. बीड विधानसभा मतदारसंघात मुस्लिम व दलित समाजातील मते निर्णायक आहेत. यामुळे येथील मुस्लिमबहुल वस्तींमध्ये ‘मुस्लिम’ नेत्यांच्या जंगी सभा झाल्या. भाजपचे सरकार आल्यास मुस्लिम, दलित समाजावर कसे अन्याय होतील, याची भीतीही व्यक्त करण्यात आली. मात्र, मतदारांनी या भीतीला भीक घातली नाही. गत पाचवर्षातही येथे भाजपचे खासदार होते, कोणत्या मुस्लिम व दलित व इतर समाजावर भाजपकडून अन्याय झाला? याचा विचार करावयास भाजप उमेदवाराने भाग पाडले. शेवटी झाले तेच हा समाज मोठ्या संख्येने भाजप उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला. बीड मतदारसंघ राष्ट्रवादीच्या प्रचाराने ढवळून निघाला होता. या प्रचारात कार्यकर्तेच नेते झाल्याने याचा फटका बसला. याउलट महायुतीचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार सुरू होता. मधल्या काळात शिवसंग्रामचे नेते आ. विनायक मेटे महायुतीसोबत आल्यानेही याचा फायदा झाला. कारण बीडमध्ये शिवसंग्रामची ताकद परिणामकारक आहे. केंद्र व राज्यातही कॉँग्रेस आघाडीची सत्ता होती. मात्र सत्ताधारी बीडकरांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी झाले. यामुळे बीडकरांनी आपला कौल भाजपच्या पारड्यात टाकला. वास्तविक बीडमध्ये भाजपची ताकद शिवसेनेपेक्षा कमी आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत सुरुवातीला शिवसैनिकांत काहीशी नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यात गोपीनाथ मुंडे यांची हातोटी कामी आली. शिवसैनिकांनी आलपी मरगळ झटकत वाडी-वस्त्यांवर प्रचाराची राळ उडवून दिली. यामुळे बीडमधून ५० हजारांची ‘लीड’ राष्टÑवादीला मिळवून देऊ, अशी वल्गना करणार्‍यांना मतदारांनी तोंडावर पाडले. गेल्या पाच वर्षांपासून बीडमधून राकॉँचे नेते, पदाधिकारी आपल्या गाडीच्या काचा कधी खाली करून जात नाहीत. रस्त्याने कोण चालले, त्याच्या वेदना काय? याच्याशी त्यांना देणे-घेणे उरले नव्हते. यामुळे सामान्यांची व राष्टÑवादीची ‘नाळ’ काही जुळलीच नाही. याचा फटका निवडणुकीत बसला. बीडमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी स्वत: फिल्डींग लावली, याचा उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. ‘अल्पसंख्यकांना भाजप-शिवसेनेची भीती दाखवा व मते मिळवा, हा राकॉँचा फंडा या निवडणुकीत कामाला आला नाही. याला मतदारांनी न बळी पडता भाजप उमेदवाराला चक्क चार हजार मतांची लिड दिली. बीड मध्ये राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाडल्याचा कांगावा केला, मात्र उपयोग झाला नाही. याउलट भाजप नेत्यांनी सामान्यांच्या घरापर्यंत जाऊन आपला प्रामाणिकपणा दाखवून पुन्हा संधी देण्याची मागणी केली, याला मतदारांनीही मनापासून साथ दिली. बीड पालकमंत्री तथा विधानसभा सदस्य राष्टÑवादीचे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन बाजार समिती, नगरपालिका अशा सर्वच संस्थावर राष्टÑवादीचा झेंडा आहे. येथून सामान्यांची कामे न झाल्याने मतदारांनी आपली चीड मतदान यंत्रातून दाखवून दिली. मतदारांच्या या ‘जोर का झटका, धीरेसे लगे’ ने आतातरी राकॉँ पदाधिकार्‍यांच्या गाडीच्या काचा खाली येतील का? सामान्यांच्या दु:ख पाहतील का? असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. नाहीतर आता पुन्हा घोडा मैदान समोरच आहे. मग ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था होऊ नये म्हणजे झाले.