शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मुरारीनगरात घरफोडी

By admin | Updated: May 12, 2015 00:48 IST

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

जालना : शहरातील कॉलेजरोडवरील मुरारीनगरात व्यापाऱ्याचे घर फोडून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला. मात्र पोलिसात ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे.कापड व्यापारी विशाल बन्सीलाल टेकवानी हे आपल्या मुरारी नगराजवळील घरात झोपलेले असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे चेनल गेट तोडून पाठीमागील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील दोन कपाट तोडून त्यातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मोठा ऐवज लंपास केला. टेकवानी यांनी ९ तोळे सोने व दीड लाख रुपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत मात्र ५० हजाराचा ऐवज लंपास केल्याचे नमुद करण्यात आले. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे सपोनि शितलकुमार बल्लाळ , उपनिरिक्षक डावखरे यांनी भेट देवून पंचनामा केला. तसेच श्वान पथकासही पाचारण करण्यात आले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. घरफोडीत चोरट्यांनी शंभर, पाचशे, हजार रूपयांच्या नोटांचे बंडल चोरून नेले. मात्र एक रूपया, दोन रूपयाची बंडले तशीच सोडली.सदर बाजार पोलिस ठाण्याचा दुरध्वनी रिसिव्हर बाजूला ठेवण्यात आला होता.या संदर्भात सदर प्रतिनिधीने ठाणे अमलंदार दिवटे यांना विचारले असता ते म्हणाले की, ११ हजाराचे बिल थकल्याने दुरध्वनी विभागाने सेवा खंडीत केली असल्याचे सांगितले. दरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास ठाण्याचा दुरध्वनी लावला असता तो चालु होता. त्यावेळी ठाणे अमंलदार मतकर यांनी हा फोन उचलला होता. दरम्यान ठाण्याच्या हद्दीत अशा चोऱ्या, घरफोड्या, जातीय दंगली सारखे गंभीर गुन्हे घडत असताना ठाने अमंलदारांकडून फोन बाजूला ठेवण्याचे प्रकार सर्वच पोलिस ठाण्यात होत आहे.४नवीन जालना भागात मोठी व्यापारपेठ आहे. मात्र ठाण्याचा दुरध्वनीच बंद असल्याने रात्री अपरात्री अशा चोऱ्यांच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांना संपर्क साधावा कसा असा प्रश्न पडत आहे. केवळ ११ हजार रूपयाचे बिल थकल्याने सेवा खंडित करण्यात आल्याचे ठाणे अमलंदार दिवटे यांनी सांगितले.