शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका यशश्री बाखरियांंना दिलासा

By admin | Updated: June 14, 2016 00:11 IST

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४७ राजाबाजारच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांना अपात्र घोषित करणारा मनपा आयुक्तांचा आदेश

औरंगाबाद : वॉर्ड क्र. ४७ राजाबाजारच्या नगरसेविका यशश्री बाखरिया यांना अपात्र घोषित करणारा मनपा आयुक्तांचा आदेश तसेच यशश्री यांचे जन्माचे प्रमाणपत्र रद्द करणाऱ्या वैद्यकीय संचालकांच्या आदेशाला न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. के. एल. वडणे यांनी सोमवारी अंतरिम स्थगिती दिली. यशश्री यांना तूर्तास नगरसेविका म्हणून काम पाहण्यास खंडपीठाने परवानगी दिली. तसेच प्रतिवादींना नोटिसा बजावण्याचा आदेश देऊन याचिकेची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर ठेवली आहे. यशश्री बाखरिया यांना मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ३ जून रोजी अपात्र घोषित केले होते. जन्माचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडून आल्यापासून आजपर्यंत मनपाकडून घेतलेले सर्व आर्थिक लाभ परत करावेत, असे आदेशात म्हटले आहे. या निर्णयाला बाखरिया यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. बाखरिया यांचे वय कमी असून त्यांनी खोटे जन्म प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढविण्याचा आरोप गजेंद्र सिद्ध यांनी केला होता. या प्रकरणात मनपा आयुक्तांसह निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या. शासन निर्देशानुसार महापालिकेने या प्रकरणाची सखोल चौकशी केली. म्यशश्री यांची जन्मतारीख १५ मे १९९५ आहे. मनपा निवडणुकीत त्यांनी १५ जानेवारी १९९४ अशी जन्मतारीख सादर केली होती. हे आदेश रद्द करावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सोमवारी सुनावणीच्या वेळी याचिकाकर्तीच्या वतीने अ‍ॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, मनपा आयुक्तांना नगरसेवकांना अपात्र घोषित करण्याचे अधिकार नाहीत. सकृतदर्शनी असा मुद्दा उपस्थित झाल्यास आयुक्तांनी सदर वाद न्यायालयात पाठविणे अपेक्षित आहे.