शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे गोल‘माल’धोरण; पथदिव्यांमध्ये साडेपाच कोटी रुपयांची खाबूगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:14 IST

शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ४० हजार पथदिव्यांपैकी २० हजार पथदिवे बंद असतानाही कंत्राटदारांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीच्या खाजगी कंपनीने साडेचार हजार नवीन पथदिवे लावलेयानंतरही जुन्या कंत्राटदारांवर मनपाच्या तिजोरीतून दरवर्षी ५ कोटी ४५ लाख ४९ हजार रुपये खर्च होत आहेत.

औरंगाबाद : शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ४० हजार पथदिव्यांपैकी २० हजार पथदिवे बंद असतानाही कंत्राटदारांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीच्या खाजगी कंपनीने साडेचार हजार नवीन पथदिवे लावल्यानंतरही जुन्या कंत्राटदारांना अक्षरश: पोसण्याचे काम सुरू आहे. यावर मनपाच्या तिजोरीतून दरवर्षी ५ कोटी ४५ लाख ४९ हजार रुपये खर्च होत आहेत.

दिल्लीच्या कंपनीला शहरात ४० हजार पथदिवे लावण्याचे काम देण्यात आले. दिवे लावल्यानंतर त्यांची ८ वर्षे देखभाल दुरुस्ती कंपनीकडेच राहणार आहे. कंपनीने मागील तीन महिन्यांमध्ये ४ हजार ५०० दिवे लावले. कंपनीला महापालिकेने अद्याप एक छदामही दिलेला नाही. यापुढे कोणत्या रस्त्यावर दिवे लावायचे याची यादीच मनपा देणार आहे. कंपनीच्या कामाची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे करण्यात आली. कंपनीने लावलेल्या पथदिव्यांचा प्रकाश (लक्स) गरजेपेक्षा जास्त असल्याचा अहवालही मनपाला प्राप्त झाला आहे. कंपनीच्या या कामावर पुढील ८ वर्षांमध्ये ११० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

महापालिकेत मागील १० वर्षांपासून पथदिव्यांच्या देखभालीसाठी २२ कंत्राटदार नेमले आहेत. चार दिवसांपूर्वीच सर्वसाधारण सभेत २२ कंत्राटदारांना ३० जून २०१८ पर्यंत कामाची वाढीव मुदत देण्यात आली. या कंत्राटदारांवर दरवर्षी साडेपाच कोटी रुपये खर्च करीत आहे. पथदिवे बंद असतानाही महापालिका कंत्राटदारांची बिले एकानंतर एक मंजूर करीत आहे. कंत्राटदारांनी काम केले किंवा नाही हे सुद्धा तपासण्यात येत नाही. २२ पैकी बहुतांश कंत्राटदार मनपाचे नगरसेवकच आहेत. त्यामुळे त्यांचे काम बंद करण्याचे धाडस प्रशासन दाखवीत नाही. नवनियुक्त आयुक्त निपुन विनायक कोट्यवधींच्या या उधळपट्टीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

एकाच कामावर डबल उधळपट्टीज्या भागात दिल्लीच्या कंपनीने पथदिवे लावले आहेत, तेथील देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराचे काम मनपाने थांबवायला हवे. असे न करता कंपनीसह कंत्राटदारांनाही निव्वळ पोसण्याचे काम प्रशासन करीत आहे. 

हे आहेत २२ कंत्राटदार : 

प्रभाग    कंत्राटदार एजन्सीप्रभाग अ    मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग अ    मे. न्यू इरा इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग अ    मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग ब    मे. न्यू इरा इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ब     मे. श्री. इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशनप्रभाग ब    मे. आकाश इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ब    मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग क    मे. न्यू इरा इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग क    मे. इगल इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग क    मे. इगल इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ड    मे. तिरुपती इलेक्ट्रिकल्स अँड सर्व्हिसेसप्रभाग ड    मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग ड    मे. असंसो लाईटस्प्रभाग ई     म. साकळगावकर इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग ई     मे. बाणेश्वर इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ई     मे. पूजा इलेक्ट्रिकल्सप्रभाग फ    मे. असंसो लाईटस्प्रभाग फ    मे. न्यू इरा इलेक्ट्रिकल्सप्रभाग फ    मे. मातोश्री इलेक्ट्रिकल्सप्रभाग फ    मे. असंसो लाईटस्देवळाई    मे. मातोश्री इलेक्ट्रिकल्ससातारा    मे. मातोश्री इलेक्ट्रिकल्स

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाelectricityवीजroad safetyरस्ते सुरक्षाMONEYपैसा