शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मीटर बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:07 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत लवकरच नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होणार आहे. या योजनेतील अटी, शर्तीनुसार महापालिका नळांना ...

औरंगाबाद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत लवकरच नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होणार आहे. या योजनेतील अटी, शर्तीनुसार महापालिका नळांना मीटर बसविणार आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मीटर बसविण्याचे काम सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात निवासी नळांना मीटर बसविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.

शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम हैदराबादच्या जीव्हीपीआर या कंपनीला देण्यात आले आहे. आगामी आठवडाभरात बँक गॅरंटी भरल्यानंतर कंत्राटदार कंपनीला कार्यारंभ आदेशदेखील दिले जाणार आहेत. त्यानंतर योजनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. या पार्श्‍वभूमीवरच पालिका आयुक्‍त पांडेय यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले की, जलयोजनेचे काम आता सुरू होणार आहे. त्यामुळे पालिकेकडून नळांना मीटर बसविण्याचेही नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील व्यावसायिक नळांना मीटर बसविण्यात येतील. त्यानंतर निवासी नळांचा विचार केला जाईल. तसेच मीटर बसविण्याचा खर्च स्मार्ट सिटीच्या निधीतून केला जाईल. त्यासाठी पुण्याच्या संस्थेमार्फत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. मीटर बसविण्याचे काम सुरू झाल्यानंतर शहरातील बेकायदा नळांचा शोधही घेतला जाणार असल्याचे आयुक्‍त पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

मनपा निवडणुकीमुळे विरोधाची भीती

समांतर जलयोजनेत मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. मात्र, त्याही वेळी पालिकेच्या या निर्णयाला विरोध झाला होता. आगामी काळात पालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निर्णयास विरोध होण्याची भीतीदेखील व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीपट्टीची थकबाकी ३२१ कोटी

नागरिक पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बहुतांश मालमत्ताधारकांकडे २० ते २५ वर्षांची पाणीपट्टी थकलेली आहे. परिणामी, थकबाकीचा आकडा वाढून ३२१ कोटींवर पोहोचला आहे. यात निवासी नळांची थकबाकी तब्बल २६४ कोटी एवढी आहे, तर व्यावसायिक नळांचे ५६ कोटी रुपये थकलेले आहेत. चालू मागणीत निवासी नळांची ४९.१४ कोटी, तर व्यावसायिक नळांची ११.८० कोटी अशी एकूण ६० कोटी ९४ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. यापैकी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत २५ टक्केदेखील वसुली झालेली नाही. त्यामुळे पालिका आता पाणीपट्टी वसुलीकडेही मोर्चा वळविणार आहे.

शहरात सव्वा लाख अनधिकृत नळ कनेक्शन

पालिकेतील सत्ताधार्‍यांनी अभय योजना राबवून केवळ हजार रुपयांत बेकायदा नळ नियमित करून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी केली नाही. पालिकेकडून नळ नियमित करताना एकदम १० ते १२ हजार रुपये दंड आकारला जात असल्याने ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आजही तब्बल सव्वा लाख नळजोडण्या बेकायदा असून, त्यातून पालिकेचा महसूलही बुडत आहे.

पाणीपट्टीची थकबाकी - चालू मागणी अशी

- निवासी नळ - १,१४,६२९

थकबाकी - २६४,९८,९२,५९२

चालू मागणी - ४९,१४,३७,७८२

एकूण - ३१४,१३,३०,३७४

- व्यावयासिक नळ - १९२३

थकबाकी - ५६,५५,६५,५९९

चालू मागणी - ११,८०,३५,९५५

एकूण - ६८,३६,०१,५५४