शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

विपश्यना केंद्राच्या परिसरातील शांततेसाठी महापालिकेने लक्ष द्यावे

By admin | Updated: July 13, 2014 00:25 IST

नांदेड : धम्मनिरंजन विपश्यना केंद्राच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख निर्माण होईल़ यासाठी महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींवर निर्बंध घालावेत,

नांदेड : धम्मनिरंजन विपश्यना केंद्राच्या माध्यमातून शहराची वेगळी ओळख निर्माण होईल़ यासाठी महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींवर निर्बंध घालावेत, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ गोदावरी नदीकाठावरील नवीन डंकीन परिसरातील धम्मनिरंजन विपश्यना केंद्रात ध्यानसत्र उभारण्यात येत आहे़ आयोजित सोहळ्यात ते बोलत होते़ विपश्यना केंद्र, नांदेड व महापालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ यावेळी पालकमंत्री डी़ पी़ सावंत, संतबाबा बलविंदरसिंघजी, माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर, आ़ ओमप्रकाश पोकर्णा, उपमहापौर आनंद चव्हाण, मनपा आयुक्त जी़ श्रीकांत, नगरसेविका डॉ़ करूणा जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती़खा़ चव्हाण म्हणाले, गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर एका चांगल्या कामाला सुरूवात होत आहे़ नांदेड शहरात चांगले उपक्रम राबविण्यासाठी माझा नेहमीच पाठिंबा राहिला आहे़ नेहमीच्या कार्यक्रमापेक्षा ध्यानमग्न होवून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला़ त्यामुळे मन प्रसन्न झाले़ नदीकाठावरील निसर्गरम्य परिसरात केवळ पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत होता़ त्यामुळे एकाग्रता अनुभवता आली़ महापालिकेने या परिसरातील शांतता कायम ठेवण्यासाठी इतर गोष्टींना निर्बंध घालावेत़ पालकमंत्री सावंत म्हणाले, ध्यान करताना श्वास व आपले किती जवळचे नाते आहे, हे समजून घेता आले़ धकाधकीच्या जीवनात ध्यानसाधना ही काळाची गरज आहे़ विपश्यना केंद्र नांदेडला होण्यासाठी महापालिकेने ५ एकर जागा दिली़ पालकमंत्री या नात्याने मलाही खारीचा वाटा उचलता आला़ नदीकाठच्या या सुंदर परिसरात येण्यासाठी चांगला रस्ता आवश्यक असून महापालिकेने याची जबाबदारी घ्यावी़ या ठिकाणी येणाऱ्या साधकाला नांदेड शहर स्वच्छ शहर वाटले पाहिजे, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे़ कार्यक्रमास विपश्यना केंद्राचे आचार्य चंद्रशेखर दहिवले, गौतम भावे, डॉ़ संग्राम जोंधळे, कुलकर्णी, चालीकवार यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)