शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा मागे घेण्यासाठी काम बंद आंदोलन

By admin | Updated: June 10, 2014 00:52 IST

उदगीर : प्रसूत महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी चौकशी समितीचा अहवाल येण्याअगोदरच वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

उदगीर : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे प्रसूत महिलेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी चौकशी समितीचा अहवाल येण्याअगोदरच वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ परत घेण्याची मागणी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे सोमवारी केली आहे. वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही, तोपर्यंत काम बंदचा पवित्रा या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात हीना जळकोटे (रा. आझादनगर, उदगीर) ही महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. परंतु, यावेळी त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे त्यांच्यावर डॉ. अंजुम कादरी यांनी उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. लातूर येथे उपचार चालू असताना हिना जळकोटे या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी हीना जळकोटे यांचे सासरे बाहुद्दीन जळकोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिसांनी रविवारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजुम कादरी व एका परिचारिकेविरुद्ध कलम ३०४ (अ) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. सोमवारी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद करून रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा परत घेण्याची मागणी केली. शिवाय, सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत सुरक्षा मिळणार नाही, तोपर्यंत काम करणार नसल्याचा पवित्रा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. (वार्ताहर)डॉक्टर किंवा रुग्णालयाकडून वैद्यकीय उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आहे का, याचा तपास करण्यासाठी प्रारंभी तज्ज्ञ समिती गठित करावी लागते. तज्ज्ञ समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई पोलिस यंत्रणेच्या अहवालाप्रमाणे करण्याचे राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २६ मार्च २०१० रोजी काढलेल्या आदेशात सांगितले आहे. शिवाय, सर्वोच्च न्यायालयानेही असेच आदेश असल्यामुळे डॉ. अंजुम कादरी व एका परिचारिकेविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घेण्याची मागणी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी या संदर्भात चौकशी समिती गठित न करता व या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच गुन्हा दाखल केल्यामुळे हे प्रकरण पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.